जानेवारी रसिकांसाठी सांस्कृतिक मेजवानीचा महिना

By admin | Published: January 28, 2016 12:54 AM2016-01-28T00:54:17+5:302016-01-28T00:54:17+5:30

थंडी संपत येण्याच्या आणि ऊन हलक्याशा तिव्रतेत येण्याच्या वाटेवर असताना, वर्षाचा पहिला महिना जानेवारी सुरु होतो.

Month of cultural feast for the month of January | जानेवारी रसिकांसाठी सांस्कृतिक मेजवानीचा महिना

जानेवारी रसिकांसाठी सांस्कृतिक मेजवानीचा महिना

Next

कुठे जावे तेच कळेना ! : साहित्य संमेलन व संगीत महोत्सव सारख्याच तारखेला
वसंत खेडेकर बल्लारपूर
थंडी संपत येण्याच्या आणि ऊन हलक्याशा तिव्रतेत येण्याच्या वाटेवर असताना, वर्षाचा पहिला महिना जानेवारी सुरु होतो. जानेवारीला उत्सवाचा आणि विशेषत: सांस्कृतिक चळवळीचा महिना म्हणावे एवढे सांस्कृतिक कार्यक्रम या महिन्यात सर्वत्र होतात. आता, वर्षारंभाचा हा महिना सरतेच्या वाटेवर आहे. मात्र हा महिना यंदा रसिकांसाठी सांस्कृतिक मेजवानीचा ठरणार आहे.
जानेवारीच्या या २६-२७ दिवसांमध्ये गावात, जिल्ह्यात, राज्यात आणि देशात किती सांस्कृतिक, सांगितीक व सामाजिक कार्यक्रम झालेत, याचे मोजमाप करता आपण अवाकच होऊ ! राज्य आणि जिल्ह्यापुरतेच बोलायचे झाल्यास क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व माता जिजाऊ जयंती, पत्रकार दिन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, तिळगुळांची गोड सक्रांत, प्रजासत्ताक दिन हे धार्मिक, राष्ट्रीय आणि दिन विशेष सण झालेत. सोबतच, शाळा कॉलेज, यामध्ये स्नेहसंमेलन झालीत. त्यात क्रीडा स्पर्धा, धमाल नाच गाणी, वादविवाद, रंगभरण स्पर्धा आणि त्यातून बक्षिसांची लयलूट असा हा रंगारंग महिना विद्यार्थ्यांसाठी ठरला. ग्रामीण भागात याच कालावधीत दंडार, नाटक यांना उधाण येते. या दिवसात रोज कुठे ना कुठे नाटक सुरु आहेच! चंद्रपूरबाबत बोलता, या शहरात सांस्कृतिक वातावरण आहे. येथे नाटकं- विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. येथील लोकांना तशी आवडही आहे. या आवडीनुसार आयोजक विविध मनोरंजक, बौद्धिक कार्यक्रमांचे आयोजन करतात आणि रसिकांचाही त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असतो.
हे महानाट्य जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात झाले होते, हे येथे उल्लेखनीय! या जानेवारीत चंद्रपुरात भरीव कार्यक्रम झालेत आणि या महिन्याचा शेवटही सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित साहित्य संमेलन आणि शास्त्रीय संगीत या दोन वेगवेगळ्या आणि मोठ्या कार्यक्रमांनी होत आहे. चंद्रपूर येथील स्नेहांकित या नामांकित संस्थेकडून गेल्या काही वर्षांपासून संगीत प्रेमीकरिता शास्त्रीय संगीताची मेजवानी म्हणून हिराई संगीत महोत्सव भरविला जातो आहे. या महोत्सवात संगीत क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होऊन आपल्या कसदार गायनाने रसिकांची मनं तृप्त करतात. यंदा हे संगीत संमेलन चंद्रपुरात ३० आणि ३१ जानेवारीला होत आहे. आणि नेमके याच तारखांसोबत म्हणजे २९ ते ३१ जानेवारी हे तीन दिवस चंद्रपुरात विदर्भ साहित्य संमेलन भरत आहे. या साहित्य संमेलनात प्रसिद्ध कादंबरीकर विश्वास पाटील, सदानंद देशमुख, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल, यासारखे दिग्गज येणार आहेत. कथाकथन, कवी संमेलन, चर्चा याने हे संमेलन रंगणार आहे. मात्र, जवळपास सारख्याच तारखेला संगीत महोत्सव आणि साहित्य संमेलन होत असल्याने रसिकांना, आपण नेमके कोणत्या कार्यक्रमात हजेरी लावून आनंद घ्यायचा, हे समजेनासे झाले आहे. या दोन्ही कार्यक्रमांच्या आयोजकांनी साहित्य प्रेमी व संगीत प्रेमी वेगळे, त्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, असा तर्क लावला असणार ! पण, हा तर्क बरोबर नाही. साहित्य व संगीताचा घनिष्ट संबंध आहे आणि या दोन्ही कला प्रकारावर सारखे प्रेम करणारे, त्यात रमणारे रसिक आहेत.
यात भरीस भर म्हणून की काय, प्रशासनाच्या वतीने ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला जल परिषद आणि कृषी मेळावा होत आहे. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग, ना.धो. महानोर, पोपटराव पवार यांच्या सारखी विद्वान मंडळी येत आहेत. आयोजकांनी हे लक्षात घेऊन वेगवेगळ्या दिवशी साहित्य व संगीत मेळाव्याचे आयोजन केले असते तर किती बरे झाले असते ! ही, रसिकांची यावर प्रतिक्रिया !

Web Title: Month of cultural feast for the month of January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.