लाठी परिसरात मुरूम खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 10:17 PM2019-03-24T22:17:10+5:302019-03-24T22:17:35+5:30
परसोडी ते सोनापूरपर्यंत १२ किमीचे डांबरीकरण व साईडिंग करण्याचे काम सुरू आहे. साईडिंग करण्यासाठी अवैधरित्या खनन करून मुरूम टाकण्यात येत आहे. महसूल विभागाचे कर्मचारी मात्र याकडे पुर्णत: दुर्लक्ष करीत आहे. पाचगाव व आर्वी येथे वर्गखोलीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या रेतीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. ठेकदारांना अभय व गरीब घरकूल लाभार्थ्यांना दंड असा दुजाभाव महसूल कर्मचारी करीत आहेत. परसोडी ते सोनापूर व नवीन पोडसा या रोडवर भरपूर प्रमाणात मुरूम टाकल्या जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तोहोगाव : परसोडी ते सोनापूरपर्यंत १२ किमीचे डांबरीकरण व साईडिंग करण्याचे काम सुरू आहे. साईडिंग करण्यासाठी अवैधरित्या खनन करून मुरूम टाकण्यात येत आहे. महसूल विभागाचे कर्मचारी मात्र याकडे पुर्णत: दुर्लक्ष करीत आहे.
पाचगाव व आर्वी येथे वर्गखोलीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या रेतीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. ठेकदारांना अभय व गरीब घरकूल लाभार्थ्यांना दंड असा दुजाभाव महसूल कर्मचारी करीत आहेत. परसोडी ते सोनापूर व नवीन पोडसा या रोडवर भरपूर प्रमाणात मुरूम टाकल्या जात आहे.
हा मुरूम वामनपल्ली व सरांडी येथील खदानीतून अवैधरित्या खनन करून टाकण्यात येत आहे. या खदानीवर जेसीबीद्वारे सात आठ फुट खोल खड्डे करून मुरूम काढण्याचे काम सदर ठेकेदार करीत आहे.
तोहोगाव येथील सर्व्हे नं. ३८९ टिपू रायपुरे यांच्या शेतातून नाममात्र ब्रास मुरूमाचा परवाना काढून हजारो ब्रास मुरूमाचे खनन केल्याचे दिसते. हाच सर्वे नं. दर्शवून वामनपल्ली व सरांडी येथील मुरूमाचे खनन सुरू असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
अनेक घाटांवरून रेती तस्करी
गांगलवाडी : ब्रम्हापुरी तालुक्यातील खरकडा,आवळगाव,हळदा, बोळधा घाटावरून सर्वात जास्त रेतीची चोरी होत असून याच भागात मोठया प्रमाणात रेती तस्कर निर्माण झाले आहेत. केवळ एक-दोन रेती तस्करावर संबंधित विभागाने कारवाई केली आहे. बोडधा घाटावरून रात्रीच्या सुमारास मोठया प्रमाणात रेतीची तस्करी होत असून ही रेती रात्री ट्रॅकद्वारे सिंदेवाहीला नेली जात असल्याची माहिती आहे. तसेच आवळगाव व खरकडा या घाटावरून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची तस्करी स्थानिक रेती चोरांकडून केली जाते व ही रेती याच भागात सुरु असलेल्या कामांना पुरविल्या जाते. याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.