मातंग समाजबांधवांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 11:45 PM2017-09-26T23:45:53+5:302017-09-26T23:46:02+5:30

राज्यात मातंग समाजाच्या चार कुटुंबांवर जातीयवादी लोकांनी हल्ले केले. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिवती तालुक्यामध्ये लहुजी ब्रिगेड, मुक्ताई ब्रिगेड व लोकस्वराज्य आंदोलनच्या वतीने निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

The morcha staged protest against the attack on the society | मातंग समाजबांधवांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा

मातंग समाजबांधवांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ मोर्चा

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात मातंग समाजाच्या चार कुटुंबांवर जातीयवादी लोकांनी हल्ले केले.

लोकमत न्यूज नेटवर्क
जिवती : राज्यात मातंग समाजाच्या चार कुटुंबांवर जातीयवादी लोकांनी हल्ले केले. त्या हल्ल्याच्या निषेधार्थ जिवती तालुक्यामध्ये लहुजी ब्रिगेड, मुक्ताई ब्रिगेड व लोकस्वराज्य आंदोलनच्या वतीने निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
या मोर्चात तालुक्यातील सर्वच गावातून शाळकरी मुली व महिला या मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. आपल्या समाजबांधवावर हल्ला झाल्याने युवक व नागरिक गावागावातून पहिल्यांदाच हजारोंच्या संख्येने जिवती येथे या मोर्चाकरिता आल्याने सर्वच मार्ग काही वेळ बंद करण्यात आली होती. तहसिलदारांंच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.
या मोर्चामध्ये शांता कसबे, विठ्ठल वाघ, गणेश वाघमारे यांच्या मारेकºयांना फाशी झाली पाहिजे व मळगे कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे तसेच दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, डॉ.कलबुर्गी, कोपर्डी प्रकरण, पत्रकार गौरी लंकेश यांच्याही मारेकºयाला फाशी व्हावी, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना लहुजी ब्रिगेड व मुक्ताई ब्रिगेड तसेच लोकस्वराज्य आंदोलनाचे पदाधिकारी डॉ.अंकुश गोतावळे, व्यंकटी जोगरे, रमाकांत जगापले, दोरे, भानूदास जाधव, देविदास कांबळे, दत्तात्रय गायकवाड, तानाजी कांबळे, विजय गोतावळे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
निषेध मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहापासून काढण्यात आला.
यात हजारोंच्या संख्येनी समाजबांधव पहिल्यांदाच रस्त्यावर उतरल्याने मोर्चा चर्चेचा विषय ठरला. शिस्तीत व नियोजनबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या मोर्चात आदिवासी संघटना, अल्पसंख्यांक संघटना, बंजारा संघटनेने पाठिंबा दर्शविल्याने व स्वत: हजर राहल्याने हा मोर्चा तालुक्यात पुढच्या काळात बदल करणारा असल्याचे दिसून आले. मोर्चाचे प्रास्ताविक दत्तराज गायकवाड यांनी तर गोदरन पाटील जुमनाके, जाधव, कांबळे, जयश्री गोतावळे, डॉ.अंकुश गोतावळे आदींनी निषेध मोर्चाला संबोधित केले. संचालन सुग्रीव गोतावळे तर आभार विजय गोतावळे यांनी मानले.

अन्यथा तीव्र आंदोलन
समाजबांधवांवर सतत होणारा अत्याचार कधीही खपवून घेतला जाणार नाही. शासनाने मोर्चाची दखल घेत आरोपींवर कारवाई करून अटक न केल्यास आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समाजबांधवांनी दिला आहे. त्यामुळे शासनाने दखल घेण्याची मागणी आहे.

Web Title: The morcha staged protest against the attack on the society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.