कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचीच अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:21 AM2021-06-01T04:21:47+5:302021-06-01T04:21:47+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८२ हजार ७८४ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७८ हजार ...

More of the healers than the coronaries | कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचीच अधिक

कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचीच अधिक

Next

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८२ हजार ७८४ वर पोहोचली आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ७८ हजार ७३९ झाली आहे. सध्या २ हजार ५९८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ४ लाख ७१ हजार २८६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३ लाख ८६ हजार २२९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४४७ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील १३४२, तेलंगणा दोन, बुलडाणा एक, गडचिरोली ३८, यवतमाळ ४८, भंडारा ११, वर्धा एक, गोंदिया दोन आणि नागपूर येथील दोन बाधितांचा समावेश आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दैनंदिन मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे, या त्रिसूत्रीचा वापर करावा. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

चंद्रपुरात ४८ पॉझिटिव्ह

आजबाधित आढळलेल्या १७९ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील ४८, चंद्रपूर तालुका २८, बल्लारपूर २८, भद्रावती ९, ब्रह्मपुरी १०, नागभीड ०३, सिंदेवाही ०८, मूल १६, सावली २, पोंभूर्णा १, गोंडपिपरी ४, राजूरा २, वरोरा ४, कोरपना ७, जिवती २ व इतर ठिकाणच्या ७ रुग्णांचा समावेश आहे.

असे आहेत मृत

आज मृत झालेल्यांमध्ये चंद्रपुरातील ४५ वर्षीय महिला. भद्रावती तालुक्यातील चिंचोली येथील ६० वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय महिला, समर्थ वाॅर्ड येथील ६५ वर्षीय पुरुष, राजुरा तालुक्यातील देशपांडे वाडी परिसरातील ५० वर्षीय महिला व गोंडपिपरी तालुक्यातील किरमिरी येथील ४५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

Web Title: More of the healers than the coronaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.