लॉकडाऊन काळातील एक हजारांहून जास्त गुन्हे रद्द होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:52 AM2021-02-06T04:52:11+5:302021-02-06T04:52:11+5:30

मास्क न घालण्याचे जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे मास्क न घातल्याप्रकरणी सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. विनाकारण घराबाहेर निघणे, सोशल डिस्टन्सिंगचे ...

More than a thousand crimes during the lockdown period will be canceled? | लॉकडाऊन काळातील एक हजारांहून जास्त गुन्हे रद्द होणार?

लॉकडाऊन काळातील एक हजारांहून जास्त गुन्हे रद्द होणार?

Next

मास्क न घालण्याचे जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हे

मास्क न घातल्याप्रकरणी सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. विनाकारण घराबाहेर निघणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, समाजमाध्यमांवर अफवा पसरविणे व तत्सम प्रकरणात गुन्ह्यांची संख्या कमी आहे. कोरोना आता आटोक्यात येत आहे. निर्बंधही शिथिल झाले असताना या प्रकरणातील आराेपींवर दोषारोपपत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. अशा पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुन्हे रद्द करण्याचे जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो नागरिकांचे याकडे लक्ष लागले आहे.

गुन्हे परत कसे घेतले जातात ?

कोरोना लॉकडाऊन व संचारबंदी काळात भा.दं.वि. १८८ अन्वये दाखल झालेले गुन्हे रद्द करण्यासाठी राज्य शासन न्यायिक प्रक्रियेचा अवलंब करणार आहे. त्यासाठी राज्यातील अशा प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती एकत्रित करणार आहे. त्यानंतर हे गुन्हे रद्द केले जाऊ शकतात. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या धाबा पोलीस ठाणेअंतर्गत दोघांचे प्रकरण, तर गोंडपिपरी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचले होते. या प्रकरणात आरोपींना दंड भरावा लागत होता.

कोट

कोरोना लॉकडाऊन व संचारबंदी काळातील गुन्हे रद्द करण्याबाबतचा असा कोणताही आदेश मिळाला नाही. कडक लाॅकडाऊन काळात जिल्ह्यात किती गुन्ह्यांची नोंद झाली, याची माहिती संकलित केल्यानंतरच देता येईल.

-अरविंद साळवी, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

Web Title: More than a thousand crimes during the lockdown period will be canceled?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.