चंद्रपूर शहरात मच्छरांचा प्रकोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:24 AM2021-01-04T04:24:48+5:302021-01-04T04:24:48+5:30

----- व्यवहार करताना अडचण चंद्रपूर : जिल्ह्यातील जिवती, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, ब्रह्मपुरी आदी तालुक्यातील गावात इंटरनेसेवा ढिम्म असल्याने नागरिकांना ...

Mosquito outbreak in Chandrapur city | चंद्रपूर शहरात मच्छरांचा प्रकोप

चंद्रपूर शहरात मच्छरांचा प्रकोप

Next

-----

व्यवहार करताना अडचण

चंद्रपूर : जिल्ह्यातील जिवती, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, ब्रह्मपुरी आदी तालुक्यातील गावात इंटरनेसेवा ढिम्म असल्याने नागरिकांना व्यवहार करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. काही बँकामध्येही हीच समस्या असल्यामुळे ग्राहकांना ताटकळत रहावे लागते. त्यामुळे इंटरनेट सेवा सुरळीत करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

रोहयोची कामे देण्याची मागणी

चंद्रपूर : औद्योगिक जिल्हा अशी चंद्रपूरची ओळख असली तरी ग्रामीण भागामध्ये आजही रोजगारासाठी बेरोजगार तसेच मजुरांना भटकंती करावी लागते. त्यामुळे गावागावात रोजगार हमी योजनेची कामे सुरु करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

---

वीज खांब हटविण्याची मागणी

चंद्रपूर : वरोरा नाका परिसरातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर काॅलेजकडे जाणाऱ्या रस्त्याच्या अगदी मधोमध वीज खांब आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, रस्त्याचे सिमेंटीकरण झाल्यामुळे वाहन चालक भरधाव वेगाने येत आहे. खांबामुळे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागाने खांब हटवून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

अतिक्रमणामुळे ग्राहक त्रस्त

चंद्रपूर : पूर्वी गोलबाजारात गांधी चौकापर्यंत जाण्यासाठी मोठा रस्ता होता. मात्र सध्या व्यावसायिकांनी या रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. या रस्त्यावरून पायी चालतानाही त्रास सहन करावा लागत आहे. काही वाहनधारक बाजारातून दुचाकी चालवित असल्यामुळे विक्रेत्यांसह ग्राहकही संताप व्यक्त करीत आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

शेतकऱ्यांना दिलासा द्यावा

चंद्रपूर: काही वर्षांपासून शेती पूर्णत: तोट्यात आली आहे. लागवडीचा खर्च देखील निघत नाही. यावर्षी तर खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी विविध योजना सुरु करून त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Mosquito outbreak in Chandrapur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.