राजुरा तालुक्यातील कोळसा खाणीत सर्वाधिक प्रदूषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 10:54 PM2019-03-06T22:54:02+5:302019-03-06T22:54:18+5:30
राजुरा तालुक्यातील वेकोलि खुल्या कोळसा खाणीद्वारे प्रचंड प्रदूषण होत असल्याने गोवरी, सास्ती, पोवनी परिसर पूर्णत: काळवंडला आहे. वेकोलिने नियम धाब्यावर बसवून कोळसा उत्पादन घेत आहे. मात्र, संबंधित अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही, असा गावकऱ्यांचा आरोप आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : राजुरा तालुक्यातील वेकोलि खुल्या कोळसा खाणीद्वारे प्रचंड प्रदूषण होत असल्याने गोवरी, सास्ती, पोवनी परिसर पूर्णत: काळवंडला आहे. वेकोलिने नियम धाब्यावर बसवून कोळसा उत्पादन घेत आहे. मात्र, संबंधित अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही, असा गावकऱ्यांचा आरोप आहे.
गोवरी, सास्ती, पोवनी, साखरी, गोयेगाव, अंतरगाव परिसरात दगडी कोळशाचे साठे आहे. वेकोलिने शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन खुल्या खाणीतून कोट्यवधी रूपयांचा कोळसा बाहेर काढत आहेत. यातून कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होते.
धुळीवर प्रतिबंधक उपाययोजना केली नाही. खाणीतील धूळ पिकांवर उडत असल्याने रबी व खरीप हंगामातील पिकांवर अनिष्ट परिणाम होत आहे. धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात प्रदूषण नियंत्रण मंडळ आहे. परंतु आजपर्यंत मोठी कारवाई झाली नाही.
जे कारखाने प्रदूषण करतात त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्याशिवाय पर्याय नाही. गोवरी, सास्ती, पोवनी, गोवरी डीप, कोळसा खाणीतील प्रदूषणावर चाप बसविणे गरजेचे आहे. वर्षाकाठी कोट्यवधी रूपयांचा नफा कमविणाºया वेकोलिला कामगार व नागरिकांच्या आरोग्याशी देणेघेणे नाही, असा आरोप परिसरातील गावकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.