बल्लारपूरचे ठाणे सर्वाधिक देखणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 11:09 PM2018-10-13T23:09:10+5:302018-10-13T23:09:41+5:30

महाराष्ट्रातील सर्वाधिक देखणे पोलीस ठाणे असलेले शहर म्हणून बल्लारपूर ओळखले जाईल. या लौकिकाप्रमाणेच या शहरात पोलीस विभागाच्या सौजन्यशील वर्तनाचादेखील या इमारतीतून परिचय होईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी रात्री केले.

Most of Than Tha Tha Ballarpur | बल्लारपूरचे ठाणे सर्वाधिक देखणे

बल्लारपूरचे ठाणे सर्वाधिक देखणे

Next
ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : बल्लारपुरात उपविभागीय पोलीस अधिकारीपद निर्मितीचे संकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्रातील सर्वाधिक देखणे पोलीस ठाणे असलेले शहर म्हणून बल्लारपूर ओळखले जाईल. या लौकिकाप्रमाणेच या शहरात पोलीस विभागाच्या सौजन्यशील वर्तनाचादेखील या इमारतीतून परिचय होईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी रात्री केले.
बल्लारपूर येथे किल्ल्याच्या स्वरूपातील पोलीस स्टेशनच्या देखण्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ब्रिटीश काळातील १९४४ च्या इमारतीमध्ये बल्लारपूर येथील पोलीस ठाण्याचे काम सुरू होते. आता या ठिकाणी प्राचीन गोंड राज्याची राजधानी असलेल्या बल्लारपूर शहराच्या इतिहासाला साजेसे किल्ल्याचे स्वरूप असलेले आधुनिक इमारतीचे लोकार्पण झाले. या लोकार्पण सोहळ्यात लवकरच बल्लारपूर येथे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे पद निर्माण करण्याचे संकेत ना. मुनगंटीवार यांनी यावेळी दिले.
या इमारतीमध्ये पोलीस विभागासाठी अत्याधुनिक सुविधा करण्यात आल्या असून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधादेखील आहे. या इमारतीसोबतच कर्मचाºयांच्या निवासस्थानांची इमारतही उभारण्यात आली असून त्याचेदेखील यावेळी लोकार्पण करण्यात आले.
या कार्यक्रमाला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, गडचिरोलीचे खासदार अशोक नेते, आमदार नाना श्यामकुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, महापौर अंजली घोटेकर, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जि.प. सभापती ब्रिजभूषण पाझारे आदींची उपस्थिती होती.
यावेळी ना.सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरच्या प्राचीन इतिहासाचा उल्लेख करताना गोंड राजा खांडक्या बल्लाळशाह यांची प्राचीन राजधानी ही बल्लारपूर होती. त्यानंतर ती चंद्रपूरला हलविण्यात आली. त्यामुळे या शहराच्या गतवैभवाला जोपासण्याचे दायित्व पार पाडणे गरजेचे असल्याचे सांगितले. नजीकच्या काळात बल्लारपूर शहराच्या विकासामध्ये तसेच लौकिकामध्ये भर टाकणाºया अनेक मोठ्या वास्तू व संस्था उभ्या राहत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या ठिकाणावरून जनतेने सातत्याने आपल्याला विधानसभेत पाठवत मोठे केले आहे. त्यामुळे बल्लारपूर सर्वात सुंदर शहर होईल, असे आश्वासन आपण गांधी चौकातल्या सभेत जनतेला दिले होते. बल्लारपूरचे रेल्वे स्थानक भारतातील सर्वात सुंदर रेल्वे स्थानक म्हणून ओळखले जात आहे. बल्लारपूरजवळ महाराष्ट्रातली दुसरी शासकीय सैनिकी शाळा पुढील वर्षीपासून पहिल्या टप्प्यात सुरू होणार आहे. बल्लारपूरमध्ये निर्माणाधीन असलेले क्रीडा संकूल आॅलिम्पिकपटू तयार करण्याच्या दर्जाचे व्हावे, यासाठी आपला प्रयत्न सुरू आहे. बल्लारपूर व परिसरातील जनतेला आता मुंबईच्या नेहरू तारांगणमध्ये जावे लागणार नाही. बंगलोरच्या धर्तीवर तयार होणाºया बॉटनिकल गार्डनमध्ये येथील जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठी अटल प्लॅनेटोरियम उभारले जात आहे. बल्लारपूर शहरातील आवास योजने संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करताना बल्लारपुरातील नागरिकांना आवास योजनेतून तीन हजार अत्याधुनिक घरे उपलब्ध केली जातील, असे ना.मुनगंटीवार यांनी सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालयाचे उपकेंद्र बल्लारपुरात
या शहरातील उद्योग व्यवसायाच्या वारस्याला जपत या ठिकाणी डायमंड कटींग सेंटर सुरू करण्यात आले आहे. हिºयांना पैलू पाडण्याच्या नकाशावर आता बल्लारपूर आले आहे. चंद्रपूर येथे निर्माण होणाºया वैद्यकीय महाविद्यालयाचे एक उपकेंद्र बल्लारपूरला सुरू करण्यात येणार आहे. बल्लारपूर शहर व मतदार संघातील सर्व जनतेला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी हा परिसर आरोयुक्त पाण्याच्या पुरवठ्याचा भाग करण्याचा आपला मानस आहे. याशिवाय शंभर टक्के गॅस वापरणारा तालुका म्हणूनही बल्लारपूरची ओळख निर्माण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आवश्यक तेवढा निधी केंद्राकडून देऊ -अहीर
बल्लारपूर येथे तयार झालेल्या नव्या इमारतीतून महाराष्ट्राच्या पोलीस व्यवस्थेतील दर्जेदार कार्याची अपेक्षा राहील, असे यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर म्हणाले. बल्लारपूर व परिसरासाठी केंद्र शासनाच्या विविध योजनातून आवश्यकता असेल तिथे निधी उपलब्ध करण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आमदार नाना श्यामकुळे यांनी गेल्या सत्तर वर्षात मिळाला नसेल इतका निधी चंद्रपूर जिल्ह्याला ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात मिळाला असल्याचे सांगितले.

Web Title: Most of Than Tha Tha Ballarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.