आरोग्य केंद्रात रुग्णांच्या आईनेच केले बाळंतपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:19 PM2018-05-20T23:19:30+5:302018-05-20T23:20:01+5:30

प्रसूती कळा आल्या. रुग्णवाहिका बोलावली तर चालक नसल्याचे सांगण्यात आले. अखेर गर्भवती महिलेच्या भावानेच दुचाकीवर आरोग्य केंद्रात आणले. मात्र आरोग्य केंद्र डॉक्टर व परिचारिका हजर नव्हते. अखेर गर्भवती महिलेच्या आईलाच आरोग्य केंद्रात बाळंतपण करावे लागले. यात आई व बाळ बचावले. मात्र आरोग्य केंद्रातील कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.

The mother of the patients in the health center did her childhood | आरोग्य केंद्रात रुग्णांच्या आईनेच केले बाळंतपण

आरोग्य केंद्रात रुग्णांच्या आईनेच केले बाळंतपण

Next
ठळक मुद्देडॉक्टर व परिचारिका अनुपस्थित : आई व बाळ थोडक्यात बचावले

लोकमत न्यूज नेटवर्क
पाटण : प्रसूती कळा आल्या. रुग्णवाहिका बोलावली तर चालक नसल्याचे सांगण्यात आले. अखेर गर्भवती महिलेच्या भावानेच दुचाकीवर आरोग्य केंद्रात आणले. मात्र आरोग्य केंद्र डॉक्टर व परिचारिका हजर नव्हते. अखेर गर्भवती महिलेच्या आईलाच आरोग्य केंद्रात बाळंतपण करावे लागले. यात आई व बाळ बचावले. मात्र आरोग्य केंद्रातील कारभारावर संताप व्यक्त केला जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आदिवासीबहुल जिवती तालुक्यातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी पाटण येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. परंतु अधिकारी व कमरचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे आरोग्य केंद्रच आजारी पडले आहे.
जिवती तालुक्यातील मौजा चौपनगुडा येथील महिला कमल नारायन राठोड (२३) ही तीन दिवसांपूर्वी पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आली होती. येथील डॉ. वाढई यांनी तुमची प्रसुती येथे होणार नाही. तुम्ही चंद्रपूरला जा, सिजर करावे लागेल, असे सांगितले. त्यानंतर वडील पैशांची जुळवाजुवळ करीत असताना शनिवारी सायंकाळी ६ वाजता कमलला प्रसुुति कळा आल्याने महिलेल्या भावाने रुग्णवाहिकेसाठी आरोग्य केंद्रात भ्रमनध्वनी लावला. मात्र चालक नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर महिलेचा भाऊ पंढरी मारोती जाधव यांनी आपल्या दुचाकीने तीन किमी पाटण येथील आरोग्य केंद्रात आणले. आरोग्य केंद्रात नर्स व डॉक्टर उपस्थित नसल्याने एकच धावपळ उडाली. अखेर कमलची आई सुशिलाबाई मारोती जाधव यांनीच कसेबसे बाळंतपण केले.
बाळाची नाळ एक ते दीड तासानंतर कापण्यात आली. डॉक्टर व नर्स नसल्याने माता व बालकाचे प्राण थोडक्यात बचावले. सदर प्रतिनिधीने महिला डॉक्टर वाढई यांना या प्रकाराबाबत विचारले असता तुम्ही मला प्रश्न विचारु शकत नाही. तुम्ही जिल्हा आरोग्य अधिकारी यांची परवानगी आणा, असे सांगितले. आरोग्य अधिकारी कविता शर्मा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
पाटण येथील ग्रामपंचायत पेसा अंतर्गत येत असून आरोग्य केंद्राला २० ते २५ गावे जोडली गेली आहे. परंतु पाटण येथील आरोग्य केंद्रात वेळेवर एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे.

मला प्रसूती कळा आल्याने माझ्या भावाने मला दुचाकीवर बसवून पाटण येथील आरोग्य केंद्रात आणले. परंतु येथे डॉक्टर व कर्मचारी हजर नसल्याने माझ्या आईनेच माझे बाळंतपण केले.
- कमल नारायण राठोड, रुग्ण महिला
यापूर्वीही अशा भोंगळ कारभारामुळे अनेक रुग्णांना आपले जीव गमवावे लागले असून बेजवाबदार डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही झालीच पाहिजे.
- अंजना भिमराव पवार,
पंचायत समिती सदस्य जिवती

Web Title: The mother of the patients in the health center did her childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.