भद्रावती ते पिपरी रस्त्यावर वाहनधारकांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:25 AM2021-02-15T04:25:00+5:302021-02-15T04:25:00+5:30
फोटो चंद्रपूर : जिल्हा परिषद अंतर्गत येणारा भद्रावती ते ढोरवासा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या ढोरवासा ते पिपरी ...
फोटो
चंद्रपूर : जिल्हा परिषद अंतर्गत येणारा भद्रावती ते ढोरवासा आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत येणाऱ्या ढोरवासा ते पिपरी रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडले आहे. मागील दोन वर्षांपासून तेलवासा ते पिपरी रस्त्यावर बारिक गिट्टीचे कव्हरिंग करण्यात आले नाही. आता तर पूर्ण रस्ता उखडल्यामुळे रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे चालकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्यामुळे छोटे-मोठे अपघात होत आहे. या मार्गाने गाडी चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. चारचाकी वाहन तर या मार्गांचे चालविणे अशक्य झाले आहे.
बाॅक्स
ढोरवासा ते तेलवासा मार्गावरील खड्डे सहा महिन्यात दोनदा बुजविण्यात आले. मात्र, निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरल्यामुळे त्या मार्गावर आणखी खड्डे पडले आहे. यामुळे या मार्गाने जाणे-येणे करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रत्येक वेळी डागडुजी न करता, तो रस्ता पूर्णतः दुरुस्त करण्यात यावी, यासाठी यापूर्वीही निवेदन देण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याला केराची टोपली दाखविली.
या समस्येकडे तत्काळ लक्ष देऊन रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवून डांबरीकरण करावे, तसेच पिपरी गावातील मुख्य चौकात काँक्रिटीकरण करून निष्काळीपणे काम करणाऱ्यांवर योग्य कारवाही करून, या मार्गावरील गावातील नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा अन्नदाता एकता मंचचे अध्यक्ष संदीप अण्णाजी कुटेमाटे, अन्नदाता एकता मंच संस्थापक अनुप सुधाकर कुटेमाटे, सदस्य सुनीता मोहन दरवी, कविता सुनील कुटेमाटे, तंटा मुक्ती समिती अध्यक्ष पंढरी कुटेमाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत डोंगे यांनी दिला आहे.