ऑटोचालकांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:26 AM2021-03-20T04:26:35+5:302021-03-20T04:26:35+5:30

मोबाइल घेण्यासाठी पाल्यांचा तगादा चंद्रपूर : कोरोनामुळे यावर्षी अद्यापही शाळा सुरू झाल्या नाही. काही शाळांनी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला ...

Motorists wait for school to start | ऑटोचालकांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा

ऑटोचालकांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा

Next

मोबाइल घेण्यासाठी पाल्यांचा तगादा

चंद्रपूर : कोरोनामुळे यावर्षी अद्यापही शाळा सुरू झाल्या नाही. काही शाळांनी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता मोबाइलची गरज भासत आहे. त्यातच काही पालकांकडे मोबाइल नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासक्रम करताना अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे विद्यार्थी सध्या पालकांकडे मोबाइल घेऊन देण्यासाठी हट्ट करीत असल्याचे चित्र आहे. आता परीक्षा जवळ आल्यामुळे अनेक पालक मोबाइल घेऊनही देत आहेत.

व्यावसायिकांकडून रस्त्यावर कचरा

चंद्रपूर : येथील काही छोटे फळविक्रेते रस्त्याच्या कडेला फळ विक्री करीत आहेत. दिवसभर व्यवसाय केल्यानंतर सायंकाळच्या सुमारास ते रस्त्यावरच कचरा टाकत असल्यामुळे चंद्रपूरच्या सौंदर्यात बाधा निर्माण होत आहे. अनेक वेळा दिवसभर कचरा उचललाच जात नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. महापालिका प्रशासनाने या व्यावसायिकांवर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

रानडुकरांचा हैदोस

चिमूर : ताडोबा बफर झोनअंतर्गत असलेल्या शिवारात रानटी डुकरांचा हौदोस सुरू आहे. त्यामुळे भाजीपाला शेतीचे नुकसान होत आहे. वनविभागाने या समस्येकडे लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.

सांडपाण्याने आरोग्याची समस्या

गोंडपिपरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये स्वच्छता मोहीम रखडली. पावसामुळे नाल्या सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्रामपंचायतीने समस्या दूर करण्याची मागणी महिलांनी केली आहे.

पथदिवे दुरुस्त करण्याची मागणी

चंद्रपूर : शहरातील अनेक पथदिवे बंद असल्याने नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. काही खांबांचे दिवे फ्यूज झाले तर काही दिवे फुटले आहेत. पावसाळ्याचे दिवस असल्याने पथदिवे दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी मनपाकडे केली आहे.

रेडिअमअभावी अपघाताची शक्यता

चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक वळण रस्त्यावर रेडिअम लावले नसल्याने रात्रीच्या वेळी वाहनांचे अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना रात्रीच्या वेळी समोरील रस्ता दिसत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्येक रस्त्यावर रेडिअम लावल्यास, अपघाताला आळा घालणे शक्य होणार आहे.

मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना धोका

वरोरा : शहरातील मोकाट कुत्रे तसेच जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर मोकाट जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. नगर परिषदने मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

इंटरनेटअभावी शेकडो ग्राहक त्रस्त

सावली : तालुक्यातील बहुतांश मोठ्या गावात इंटरनेसेवा पावसामुळे ढिम्म असल्याने ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही बँकांमध्येही हीच समस्या असल्यामुळे ग्राहकांना ताटकळत राहावे लागते. दूरसंचार विभागाने इंटरनेट सेवा सुरळीत करण्याची मागणी आहे. शासकीय कार्यालयात सर्व कामे नेटच्या आधारावर केली जातात. मात्र, नेटवर्क राहत नसल्याने कामे ठप्प पडत आहेत. त्यामुळे नेटसेवा सुरळीत करावी, अशी मागणी आहे.

कोंडवाड्यांची दुरवस्था जनावरांचे हाल

चंद्रपूर : जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीने कोंडवाडे बांधले आहेत. मात्र, निधीअभावी कोंडवाड्याची दुरवस्था झाल्याने जनावरांचे हाल होत आहेत. कोरोनामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात घट झाली. जिल्हा परिषदेने निधी वितरण केले नाही. शिल्लक निधी शासनाने परत मागविला. त्यामुळे ग्रामपंचायती आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. कोंडवाड्यांची दुरुस्ती करण्यास निधीच नाही.

Web Title: Motorists wait for school to start

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.