गोंडपिपरी तालुक्यात मूलभूत समस्यांचा डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:36 AM2017-09-07T00:36:25+5:302017-09-07T00:36:54+5:30
गोंडपिपरी तालुक्यातील अनेक गावात वीज, रस्ते, पाणी अशा अनेक समस्या आहेत. त्या समस्येची त्वरित सोडवणूक करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने तहसीलदारांना....
लोकमत न्यूज नेटवर्क
तोहोगाव : गोंडपिपरी तालुक्यातील अनेक गावात वीज, रस्ते, पाणी अशा अनेक समस्या आहेत. त्या समस्येची त्वरित सोडवणूक करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने तहसीलदारांना सोमवारी दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.
मागील काही महिन्यांपासून वीज बिलामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. वीज बिलामध्ये अन्य आकार जसे स्थीर आकार, वीज शुल्क, इंधन समायोजन आकार, विक्री कर इत्यादी अनावश्यक कर जोडून वीज बिल पाठविल्या जात आहे. त्यामुळे ग्राहकांना एक हजार रुपयांपासून ते सहा हजार रुपयापर्यंत वीज बिल येत आहे. नागरिकांना ते नाइलाजास्तव भरावे लागत आहे. यामुळे जनता त्रस्त झाली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाद्वारे विशेष निधीतून व अन्य निधीतून संपूर्ण महाराष्ट्रात काँक्रीट रोडचे व नालीचे बांधकाम करण्यात आले. यामध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्या गेलेले आहे. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेले निर्देशनास येत आहे. अनेक ठिकाणचे रस्ते उखळलेले आहेत. पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक गावामध्ये पिण्याचे पाणी दूषित आहे. तरी संपूर्ण तालुक्यामध्ये स्वच्छ पाणी उपलब्ध करावे, तसेच गोंडपिपरी नगर पंचायतमध्ये नगराध्यासहित अन्य नऊ नगरसेवक जात वैधता प्रमाणपत्र अजूनपर्यंत सादर केलेले नाही. त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे, अशा गोंडपिपरी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. व त्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. या समस्येमुळे नागरिक हवालदिल झाला आहे. त्यामुळे त्या समस्या त्वरीत सोडविण्यात याव्या अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशरा बिआरएसपीच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदन देणाºया शिष्टमंडळात तालुका अध्यक्ष राजेश डोडीवार, उपाध्यक्ष राजू खामणकर, महासचिव सम्राट भडके, कोषाध्यक्ष श्याम अवथरे, तालुका सचिव शेखर बोनगीरवार, तालुका सचिव विनोद झाडे, तालुका सचिव भारत अवथरे, विजय दुर्गे, शहर अध्यक्ष सचिन झाडे, शहर उपाध्यक्ष तिरुपती झाडे, शहर महासचिव केशव देठे, तालुका कोषाध्यक्ष दिलीप पेंदोर यांच्यासह, उद्धव इटकेलवार, प्रकाश झाडे, सुनील देवगडे, विलास पिपरे, संजय वाडगुरे, प्रकाश झाडे, वैभव निमगडे, बंडू दुर्गे, प्रशांत मानकर, विनोद चुनारकर, आशिष निमगडे, चेतन अवथरे, गुंजन डोंगरे, रत्नदिप माऊलीकर आदी उपस्थित होते.