नगिनाबाग परिसरात समस्यांचा डोंगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:29 AM2021-08-26T04:29:53+5:302021-08-26T04:29:53+5:30
चंद्रपूर : नगिनाबाग परिसरात अनेक समस्या आहेत. परिणामी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील समस्या सोडवावी, अशी ...
चंद्रपूर : नगिनाबाग परिसरात अनेक समस्या आहेत. परिणामी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे परिसरातील समस्या सोडवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सेंट मायकल मिशन कंपाऊंड परिसरात मोठी पुरातन विहीर आहे. विहिरीच्या सभोवताली मोठ-मोठी झाडे-झुडपे तयार झाली आहेत. ती विहीर उघडी असल्याने अनेकजणांचा तेथे पडून मृत्यू झाला आहे, तर काही जखमीसुद्धा झाले आहेत. त्यामुळे या विहिरीला वरून झाकण बसवावे, तसेच परिसराची स्वच्छता करावी, तसेच डेंग्यूने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. अस्वच्छतेने डासांची उत्पती होत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे वॉर्डत फवारणी करावी, परिसरातील स्वच्छता करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी आयुक्तांना तसेच वॉर्डातील नगरसेविकेला दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी संगीता पेटकुले, छाया सोनुले, सुरेखा लेनगुरे, विना पेटकुले, पुजा पेटकुले तसेच परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते.