शोकाकुल लष्‍करे परिवाराचे आ. मुनगंटीवारांकडून सांत्‍वन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:20 AM2021-07-15T04:20:52+5:302021-07-15T04:20:52+5:30

दुर्गापूर : जनरेटरमधील गॅस गळतीमुळे रमेश लष्‍करे यांच्‍यासह त्‍यांच्‍या कुटुंबातील सहाजणांचा दुर्देवी मृत्‍यू झाल्‍याच्‍या घटनेसंदर्भात माजी अर्थमंत्री आ. सुधीर ...

The mourners of the Lashkare family. Consolation from the Mungantiwars | शोकाकुल लष्‍करे परिवाराचे आ. मुनगंटीवारांकडून सांत्‍वन

शोकाकुल लष्‍करे परिवाराचे आ. मुनगंटीवारांकडून सांत्‍वन

Next

दुर्गापूर : जनरेटरमधील गॅस गळतीमुळे रमेश लष्‍करे यांच्‍यासह त्‍यांच्‍या कुटुंबातील सहाजणांचा दुर्देवी मृत्‍यू झाल्‍याच्‍या घटनेसंदर्भात माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजप पदाधिकाऱ्यांसह बुधवारी लष्‍करे कुटुंबियांची भेट घेत त्‍यांचे सांत्‍वन केले.

यावेळी मृत रमेश लष्‍करे यांची पत्नी नागम्‍मा लष्‍करे व त्‍यांचे नातेवाईक उपस्थित होते. या दुर्घटनेत मृत झालेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या कुटुंबियांना मुख्‍यमंत्री सहा्यता निधीतून अर्थसहाय्य मंजूर करावे, या मागणीसाठी आ. मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने यांची भेट घेत निवेदन सादर केले. मृतांच्‍या कुटुंबियांना १० लाख रुपयाचे अर्थसहाय्य मिळण्‍याबाबतचा प्रस्‍ताव मुख्‍यमंत्री सचिवालयाला सादर करण्‍याच्‍या सूचना आ. मुनगंटीवार यांनी जिल्‍हाधिकाऱ्यांना केल्‍या. यावेळी जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपाध्‍यक्ष रामपाल सिंह, चंद्रपूर तालुकाध्‍यक्ष हनुमान काकडे, रोशनी खान, केमा रायपुरे, विलास टेंभुर्णे, श्रीनिवास जंगमवार आदींची उपस्थिती होती.

Web Title: The mourners of the Lashkare family. Consolation from the Mungantiwars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.