शेतकºयांचे वीज वितरण कंपनीविरोधात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 11:35 PM2017-11-02T23:35:43+5:302017-11-02T23:35:54+5:30
तालुक्यातील शेतकºयांनी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भद्रावती : तालुक्यातील शेतकºयांनी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर गुरुवारी धरणे आंदोलन केले.
तालुक्यातील नंदोरी, पाटाळा, माजरी, कोंढा आदी ठिकाणी दिवसा सिंगल फेज वीज पुरवठा केला जातो. यामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. रात्रीच्या सुमारास व्यवस्थित वीज पुरवठा होतो. मात्र जंगली श्वापदाची भीती असते. त्यामुळे वीज वितरण कंपनीने दिवसाही तालुक्यात थ्री फेज वीज पुरवठा सुरू करावा व आठ ते दहा तास होणारे भारनियमन तत्काळ कमी करावे, या मागणीसाठी तालुक्यातील शेतकºयांनी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धडक दिली. तिथेच दिवसभर धरणे आंदोलन केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती अर्चना जीवतोडे, जि. प. सदस्य यशवंत वाघ, पं.स. सदस्य प्रविण ठेंगणे, विजय वानखेडे, ओम मांडवकर, सुधाकर जीवतोडे, भानुदास ढवस, प्रदीप महाकूलकर, संजय ढाकणे, संदीप एकरे, बंडू थेरे, महेंद्र वांढरे, गहूदास उमरे, किशोर गोवारदिपे आदी उपस्थित होते.
कीटकनाशक प्राशन करण्याचा इशारा
आता खरीप हंगामातील पीक शेतकºयांच्या हाती येण्याची वेळ आहे. मात्र पिकांना एका पाण्याची आवश्यकता आहे. मात्र महावितरणच्या धोरणामुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. वीज वितरण कंपनीने शेतकºयांची अडचण लक्षात घेऊन तत्काळ भारनियमनातून मुक्ती द्यावी व थ्री फेज वीज पुरवठा सुरू करावा, अन्यथा कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या करू, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अभियंता राठी यांना दिला आहे.