वीज दरवाढीविरोधात आंदोलन
By admin | Published: November 27, 2015 01:20 AM2015-11-27T01:20:11+5:302015-11-27T01:20:11+5:30
महावितरणने नुकतीच वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. वीज बिलामध्ये करण्यात आलेली वाढ ही सामान्यांसाठी जिवघेणी असून केलेली दरवाढ ही पूर्ववत करण्यात यावी....
चंद्रपूर : महावितरणने नुकतीच वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. वीज बिलामध्ये करण्यात आलेली वाढ ही सामान्यांसाठी जिवघेणी असून केलेली दरवाढ ही पूर्ववत करण्यात यावी, या मागणीसाठी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
सीटीपीएस येथील प्रदूषणामुळे अनेक गंभीर आजाराशी नागरिकांना झटावे लागत आहे. सन २००३ च्या न्यायालयाच्या याचिकेनुसार विद्युत उत्पादित करणाऱ्या क्षेत्रात विद्युत बिलामध्ये जवळजवळ ७ टक्के सबसिडी देण्यात येते. परंतु आजपर्यंत चंद्रपूर शहराला कधीही वीज बिलामध्ये सबसिडी देण्यात आली नाही. नागरिकांच्या या रास्त मागण्यांना घेऊन चंद्रपूर शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे स्थानिक एमएसईबी कार्यालय (बागला चौक) बाबुपेठ, चंद्रपूर येथे वीज बिल दहन व धरणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला परिसरातील ३०० च्या जवळपास नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवून महावितरणच्या विरोधात नारे देत होणाऱ्या अन्यायाचा निषेध केला. मनसेचे उपशहर अध्यक्ष प्रकाश चंदनखेडे, विभाग अध्यक्ष महेश शास्त्रकार व शहर उपाध्यक्ष महेश वासलवार यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनाला मनसेचे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, जिल्हा महिला सुनिता गायकवाड, मनविसेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, मनपाचे सभापती सचिन भोयर, मनसे माजी जिल्हाध्यक्ष राजु अल्लेवार, मनसे जिल्हाध्यक्ष, रोजगार-स्वरोजगार संघटना चंद्रपूरचे राजु कुकडे, संपर्क प्रमुख मनसे रोजगार-स्वरोजगार संघटना चंद्रपूर प्रज्योत नळे, तालुका अध्यक्ष सुजय अवतरे, विभाग अध्यक्ष मनोज तांबेकर, मनविसेचे जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष मनसे चंद्रपूर जिल्हा मनदिप रोडे, मनविसेचे शहर अध्यक्ष विवेक धोटे, जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
एमएसईबी कार्यालय (बागला चौक) बाबुपेठ वार्ड चंद्रपूर येथे वीज बिलाचे दहन करण्यात आले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपस्थित मनसेच्या कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी कार्यालयासमोरच धरणा दिला.
यावेळी सबंधित अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. धरणे आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी संदीप शिडाम, भरत गुप्ता, सचिन कोतपल्लीवार, दुष्यंत लाटेलवार, राजु येंभूर्णे, सुतार, सुयोग धनवलकर, प्रगती भोसले, प्रशांत भोसले, देवांगण, कल्याण वालदे, अमजद शेख, तिरूपती बालाजी, शिवलाल वर्मा, भोयर बल्लारपूर, शुभम तितरे, चेतन डोईजड, शाहरूख शेख, दीपक पडोटी, सचिन झाडे, संजय आवळे आदींनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)