मोबदल्यासाठी पोवनी कोळसा खाणींच्या प्रकल्पग्रस्त शेतकºयांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 11:53 PM2017-10-10T23:53:26+5:302017-10-10T23:53:41+5:30

राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत नव्याने सुरू झालेली पोवनी-२ कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता बंद पाडली.

Movement of project affected farmers of Powai coal mines for compensation | मोबदल्यासाठी पोवनी कोळसा खाणींच्या प्रकल्पग्रस्त शेतकºयांचे आंदोलन

मोबदल्यासाठी पोवनी कोळसा खाणींच्या प्रकल्पग्रस्त शेतकºयांचे आंदोलन

Next
ठळक मुद्देबेमुदत उपोषण सुरू : वेकोलिची पोवनी-२ कोळसा खाण पाडली बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
सास्ती : राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत नव्याने सुरू झालेली पोवनी-२ कोळसा खाण प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता बंद पाडली. आपल्या हक्काच्या मोबदल्यासाठी व इतर मागण्यांकरिता प्रकल्पग्रस्तांनी आंदोलन सुरू केले असून खाणीसमोर मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत विविध नव्या कोळसा खाणीकरिता परिसरातील साखरी, पोवनी, वरोडासह इतर गावातील सुपिक जमिनीचे अधिग्रहण सुरू आहे. पोवनी २ व ३ या कोळसा खाणीकरिता पोवनी, साखरी, वरोडा येथील शेतकºयांना शेतजमिनी २७ नोव्हेबर २०१५ रोजी वेकोलि प्रशासनाने सेक्शन ११ लावून अधिग्रहीत करणे सुरू केले. आॅक्टोबर २०१६ पासून पोवनी-३ प्रकल्पग्रस्तांचे अ‍ॅग्रीमेंट सुरू केले. परंतु, अजूनही प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळालेला नाही. मात्र २४ सप्टेंबरला साखरी येथे वेकोलि प्रशासनाच्या अधिकाºयांनी पोवनी-३ च्या प्रकल्पग्रस्त शेतकºयांची बैठक घेऊन प्रकल्पग्रस्त शेतकºयांना २०१३ च्या नव्या कायद्यानुसार अधिग्रहणाचा दर कमी झाला असून तो २ ते ३ लाख रुपये प्रती एकरी दिला जाईल, अशी माहिती दिली. त्यावर प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी हा दर मान्य नसून आम्ही आमच्या जमिनी वेकोलिला देणार नाही, असा इशारा दिला. त्यानंतर प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी आंदोलनाचा इशाराही दिला. परंतु, वेकोलि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले.
दरम्यान, मंगळवारी प्रकल्पग्रस्त शेतकºयांनी आंदोलन सुरू करून साखरी येथील हनुमान मंदिरातून रॅली काढून वेकोलिच्या पोवनी-२ ही खाण सकाळी ११ वाजताच्या सुमारास बंद पाडली. त्यानंतर खाणीसमोरील रस्त्यावर बेमुदत उपोषण सुरू केले. उपोषणस्थळी वेकोलिचे अधिकारी मनोज नवले, रमेशसिंग यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत मुख्य महाप्रबंधकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले
या आंदोलनात सरपंच भाऊ कोडापे, अमोल घटे, धर्मराज उरकुडे, खुशाब पोडे, विजय काटवले, शेषराव बोंडे, उत्तम बोबडे, अरुण उरकुडे, मारोती उरकुडे, अविनाश देठे, विनोद गालफाडे, नरेश लांडे, संदिप बोढे, विनोद कावळे, शैलेश गंपावार, व्यंकन्ना, चंद्रकांत लेडांगे, जितू उमरे यांच्या सह शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी सहभागी होते.

Web Title: Movement of project affected farmers of Powai coal mines for compensation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.