प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे ताडाळी येथे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:36 PM2017-11-29T23:36:31+5:302017-11-29T23:36:54+5:30

ताडाळी येथील धारीवाल कंपनीच्या लाभांश क्षेत्रात येणाऱ्या दहा गावातील शेतकरी, सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शनिवारी विविध मागण्यांसाठी प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले.

Movement of the project affected farmers at Tadali | प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे ताडाळी येथे आंदोलन

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे ताडाळी येथे आंदोलन

Next
ठळक मुद्देसमस्या : बेरोजगार युवकांचाही सहभाग

चंद्रपूर : ताडाळी येथील धारीवाल कंपनीच्या लाभांश क्षेत्रात येणाऱ्या दहा गावातील शेतकरी, सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शनिवारी विविध मागण्यांसाठी प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो बेरोजगार युवकही सहभागी झाले होते.
धारीवाल कंपनीने प्रकल्पासाठी ताडाळी, विरूर, मोरवा, साखरवाही, सोनेगाव, अंतुर्ला, पांढरकवडा, धानोरा, शेणगाव व वढा येथील शेतकºयांच्या जमिनी घेतल्या. मात्र, स्थानिक बेरोजगार युवकांना कामावर घेतले नाही. कंपनीच्या प्रदूषणामुळे पीक व जमिनीचे नुकसान होत आहे. या कंपनीला मोठ्या प्रमाणात आर्थिक नफा मिळतो. परंतु, सामाजिक बांधिलकी म्हणून नागरिकांच्या विकासासाठी निधी खर्च केला जात नाही. प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले. त्यासाठी मोफत आरोग्य शिबिर लावणे गरजेचे आहे. शिवाय, दर महिण्याला तपासणी करून औषधी पुरवठा करण्याकडे कंपनीने लक्ष दिले पाहिजे. शेतीचे नुकसान झाल्यानंतर भरपाई देण्याची जबाबदारी कंपनीची आहे. पण, कंपनीने दुर्लक्ष केले. साखरवाही येथील नागेश बोंडे यांच्या नेतृत्वात दहा गावांतील नागरिकांनी आंदोलन केले. कंपनीचे व्यवस्थापक मुखर्जी यांना निवेदन देवून समस्या सोडविण्याची मागणी केली. यावेळी माजी सभापती रोशन पचारे, हितेश लोढे, मनोज आमटे, मधुकर बरडे, नंदकिशोर वासाडे, ज्योती आसेकर, वंदना घोरुडे, सरपंच इंदिरा कासवटे, सरपंच छबूताई बोंडे, सुरेश तोतडे, साईबाबा झाडे, सुबोध कासवटे, छाया वासाडे आदी सहभागी झाले होते.

Web Title: Movement of the project affected farmers at Tadali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.