सेवानिवृत्त शिक्षकांचे आंदोलन सुरू

By admin | Published: November 16, 2016 12:56 AM2016-11-16T00:56:08+5:302016-11-16T00:56:08+5:30

सेवानिवृत्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी चंद्रपूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघातर्फे ...

The movement of retired teachers continues | सेवानिवृत्त शिक्षकांचे आंदोलन सुरू

सेवानिवृत्त शिक्षकांचे आंदोलन सुरू

Next

तीन टप्प्यात आंदोलन : विविध मागण्या सोडविण्याची मागणी
चंद्रपूर : सेवानिवृत्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी चंद्रपूर जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघातर्फे मंगळवारपासून जिल्हाभर आंदोलनाला सुरूवात केली आहे. सदर आंदोलन तीन टप्प्यात होणार असून मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
मंगळवारी जिल्हा परिषद व जिल्हा कार्यकारी मंडळ कार्यालयासमोर धरणे करण्यात आले. बुधवारपासून सर्व तालुका मुख्यालयी आंदोलन होणार असून १९ ला पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात बेमुदत साखळी उपोषण व तिसऱ्या टप्प्यात पुन्हा धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष एस. एल. बोडणे, उपाध्यक्ष पु. रा. ठेंगणे, एम. के. जगताप, म. ल. डाहुले, रजनी भडके, एन. बी. दासरवार, मा. ुला. टोंगे, बी. आर. राजूरकर, पी. व्ही. कन्नमवार, एस. पी. कुंदोजवार, आर. डी. उरकुडे, एम. पी. झाडे, शांता लांबट यांच्यासह अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. (स्थानिक प्रतिनिधी)

अशा आहेत मागण्या
सेवानिवृत्त शिक्षकांना निवडश्रेणीचा लाभ द्यावा, खंडीत सेवा क्षमापित करावी, १ जानेवारी १९८६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळालेला नाही. त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ द्यावा, सुधारीत निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतनाचा लाभ द्यावा, पाचव्या वेतन आयोगानुसार वेतन पडताळणी करण्यात यावी, ड्रीम ट्रेन्ड शिक्षकांना सुधारीत वेतन श्रेणी द्यावी, सहावे वेतन आयोगाची थकबाकी द्यावी, प्रवास भत्ता बिल मंजूर करावे आदी मागण्यांचा समावेश आहे.

Web Title: The movement of retired teachers continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.