कृषी महाविद्यालयात लेखणी बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2020 05:00 AM2020-11-06T05:00:00+5:302020-11-06T05:00:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वरोरा : शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत आहे. मात्र, कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळत आहे. मात्र, कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी या लाभापासून वंचित आहेत. त्यामुळे कृषी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारले. येथील आनंदनिकेतन कृषी महाविद्यालयात प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदिवला.
राज्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. मात्र राज्यातील कृषी क्षेत्रातील शिक्षण संशोधन आणि विस्ताराच्या कार्यात प्रमुख भूमिका बजावणाऱ्या कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अद्यापही हा आयोग लागू करण्यात आलेला नाही. त्यामुळे राज्यस्तरीय कृती समितीच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून अधिकारी, लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले. त्यानंतर काळी फीत लावून निषेध नोंदविण्यात आला़ मात्र, शासनाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे २ नोव्हेंबरपासून राज्यभरात लेखणीबंद आंदोलन करण्यात आले.
यावेळी कर्मचाऱ्यांनी परिसरात स्वच्छता अभियान राबवून गांधीगिरी केली. त्यानंतर आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्यामार्फत शासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. ६ नोव्हेंबरपासून राज्यातील कर्मचारी सामूिहक रजा आंदोलन करण्यात असून ७ नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषण करणार आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.