वेकोलि खाणीत कामगार संघटनांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:27 AM2021-02-07T04:27:03+5:302021-02-07T04:27:03+5:30

शेतकरी व देशविरोधी कृषी कायदे रद्द करा राजुरा : शेतकरीविरोधी तिन्ही कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी गेल्या दोन ...

Movement of trade unions in Vekoli mine | वेकोलि खाणीत कामगार संघटनांचे आंदोलन

वेकोलि खाणीत कामगार संघटनांचे आंदोलन

Next

शेतकरी व देशविरोधी कृषी कायदे रद्द करा

राजुरा : शेतकरीविरोधी तिन्ही कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून नवी दिल्ली सीमेवर लढा देत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि आजच्या देशव्यापी 'रास्ता रोको ' आंदोलनाला समर्थन देण्यासाठी कोल इंडियाच्या मान्यताप्राप्त संघटनांनी शनिवारी कोळसा खाणीत जोरदार निदर्शने आणि द्वारसभा घेऊन सरकारच्या शेतकरी व कामगारविरोधी धोरणांचा जोरदार विरोध नोंदविला.

या भागातील कोळसा खाणीत शनिवारी सरकारचा निषेध करीत शेतकरीविरोधी कायदे मागे घेण्याची मागणी करण्यात आली. इंटक, आयटक, एचएमएस व सिटू या कामगार संघटनांनी हे आंदोलन केले.

वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रातील सास्ती, गोवरी, पोवनी, धोपटाळा, साखरी, गोवरी डीप या ओपनकास्ट आणि बल्लारपूर व सास्ती या भूमिगत अशा आठही खाणीत सकाळी ८ वाजता कामगारांच्या द्वारसभा झाल्या. या वेळी सरकारने पारित केलेले तीनही कृषी कायदे तातडीने रद्द करावे आणि कामगारांच्या हिताचे असलेले ४४ कायदे रद्द करून त्यांचे फक्त चार कोड निर्माण करून संपवण्यात आलेल्या कामगार कायद्यातील परिवर्तन रद्द करून पूर्वीप्रमाणेच ४४ कायदे लागू करावे, अशी एकमुखी मागणी इंटक, आयटक, एचएमएस व सिटू या चारही मान्यताप्राप्त कामगार संघटनांनी केली.

या वेळी इंटक नेते आर.आर. यादव, अशोक चिवंडे, आर.एम. झुपाका, दिलीप कनकूलवार, विजय कानकाटे, रवी डाहुले, प्रभाकर सुचूवार, गणेश नाथे, राजेश्वर डेबिटवार यांची भाषणे झाली.

संचालन दिनेश जावरे यांनी केले. या वेळी मधुकर ठाकरे, पुरुषोत्तम मोहुर्ले, नागेश मेदर, लोमेश लाडे, श्रीपूरम रामलू आदी उपस्थित होते.

Web Title: Movement of trade unions in Vekoli mine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.