वेकोलि प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 12:04 AM2017-10-26T00:04:09+5:302017-10-26T00:04:20+5:30

बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील पौनी २ व ३ कोळसा खाणीसाठी शेतकºयांच्या जमिनी ताब्यात घेऊनही मोबदला न मिळाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारपासून आंदोलन सुरू आहे.

 The movement of the Wakoli project affected people continued | वेकोलि प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरूच

वेकोलि प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरूच

Next
ठळक मुद्देआंदोलनाचा पाचवा दिवस : अधिकाºयांचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील पौनी २ व ३ कोळसा खाणीसाठी शेतकºयांच्या जमिनी ताब्यात घेऊनही मोबदला न मिळाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारपासून आंदोलन सुरू आहे. मात्र पाच दिवस होऊनही अधिकाºयांनी दखल घेतली नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
राजुरा तालुक्यातील साखरी येथील व परिसरातील वेकोलि प्रशासनाने जमिनी घेताना करारनामा करताना २०१२ च्या जमीन हस्तांतर कायद्याचा आधार घेण्यात आला. प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध होताच वेकोलि प्रशासनाने प्रकल्पग्रस्त ७०० वर शेतकºयांच्या फसवणुकीचे धोरण अवलंबिल्याने बल्लारपूर वेकोलि क्षेत्र विरोधात प्रकल्पग्रस्त शेतकºयांच्या आक्रोश उफाळून आला आहे. साखरी येथील हनुमान मंदीर परिसरातील पौनी-२ खाण येथे न्याय मागण्यासाठी लक्ष वेधण्यासाी २० आॅक्टोबरपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. यासाठी ऐन दिवाळीच्या सणातही प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत उपोषण सोडले नाही. करारनाम्यानुसार प्रकल्पग्रस्त शेतकºयांना एकरी ८ ते १० लाख रुपये मोबदला मिळावा. सातबारा नमुन्यानुसार नोकरी द्यावी आदी अन्य मागण्याला धरून आंदोलन केले जात आहे.
मात्र बल्लारपूर वेकोलिच्या अधिकाºयांची अद्यापही झोप उघडली नाही. मतांचा जोगवा मागणाºयांनीही ेआश्वासनाच्या पलीकडे काही केले नाही.आहे. भ्रष्टाचाराने बरबरटले वेकोलिच्या अधिकाºयांना प्रकल्पग्रस्तांच्या समस्येशी काहीच करणे नाही, अशी वृत्ती जोपासून आहेत. बल्लारपूर वेकोलिने पौनी २ व ३ कोळसा खाण सुरू करण्यासाठी तब्बल ७०२ शेतकºयांशी करार केला. करारनाम्यानुसार २०१६ पर्यंत जमिनीचा मोबदला एकरी ८ ते १० लाख रुपये व कुटुंबातील बेरोजगारांना नोकरी देण्याचे मान्य केले. पौनी-२ क्रमांकाची कोळसा खाण सुरू करताना काही शेतकºयांना मोबदला देण्यात आला. मात्र प्रकल्पग्रस्त शेतकºयांची दिशाभूल करून पौनी २ व ३ प्रकल्पातून कोळशाचे उत्खनन करूनही करारनुसार मोबदला व नोकरी देण्यास वेकोलिने टाळाटाळीचे धोरण स्वीकारले आहे.
त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकºयात असंतोषाचा वणवा पेटला आहे. आंदोलनात साखरी येथील उत्तम बोबडे, अमोल घटे, यादव येरगुडे, शेषराव बोंडे, प्रमोद गाडगे, ज्ञानेश्वर येरगुडे, विजय बनसुले, लटारी भोयर, राकेश उरकुडे, शंकर उकीनकर, चंद्रकांत लेडांगे आदी प्रकल्पग्रस्तांसह शेकडो नागरीक सहभागी झाले आहेत.

Web Title:  The movement of the Wakoli project affected people continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.