बसस्थानक स्थानांतरणासाठी हालचाली

By admin | Published: May 23, 2016 01:01 AM2016-05-23T01:01:47+5:302016-05-23T01:01:47+5:30

येथील विश्राम गृहाच्या जागेवर बसस्थानकाची निर्मिती व्हावी यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु असून नागभीड येथील

Movements for bus station movements | बसस्थानक स्थानांतरणासाठी हालचाली

बसस्थानक स्थानांतरणासाठी हालचाली

Next

‘लोकमत’ने वेधले होते लक्ष : बांधकाम व परिवहन मंत्र्यांशी करणार चर्चा
नागभीड : येथील विश्राम गृहाच्या जागेवर बसस्थानकाची निर्मिती व्हावी यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु असून नागभीड येथील काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चिमूरचे आमदार किर्तीकुमार भांगडिया बांधकाम मंत्री आणि परिवहनमंत्री यांची भेट घेणार आहेत.
नागभीड येथे बसस्थानकाची निर्मिती करण्यात आली. पण ते बसस्थानक गावापासून बरेच लांब असल्याने अडगळीत पडले आहे. त्यातच नागभीड येथे चार ठिकाणी बसथांबे देण्यात आले असून हे बसथांबे प्रवाशांना गैरसोयीचे होत आहेत. जुन्या बसस्थानक वगळता तीन बसधाब्यांचे विसर्जन करुन विश्रामगृहाच्या जागेवर नवीन बसस्थानकाची निर्मिती करावी, अशी नागभीडकरांची मागणी आहे.
लोकमतने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केल्यानंतर या मागणीने आणखीच जोर धरला. येथील भाजपाचे नेते गणेश तर्वेकर यांनी आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या उपस्थितीत प्रमुख कार्यकर्त्यांची या विषयावर चर्चाही घडवून आणली. सर्वांनी या बाबीस दुजोरासुद्धा दिला. या चर्चेचा संदर्भ घेवून आमदार भांगडिया यांनी संबंधित विभागास या संदर्भात अहवाल तयार करण्याचा सूचना केल्या होत्या.
विश्वसनीय माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात याचसंदर्भात एक सभासुध्दा शुक्रवारी झाल्याची माहिती आहे.
एव्हढेच नाही तर या सभेचा अहवाल परिवहन विभागाला पाठविण्यात आल्याचीही माहिती आहे. दरम्यान, नागभीड येथे सा.बां. विभागाचे विभागीय कार्यालयसुद्धा मंजूर झाले असून विभागीय कार्यालयाच्या इमारतीचा निधीही मंजूर झाला आहे. या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच पार पडले. सां.बा. विभागाच्या इमारतीचे बांधकाम सुरु होण्यापूर्वी दोन्ही विभागाच्या जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडावी, अशी मागणी आमदार किर्तीकुमार भांगडिया दोन्ही विभागाच्या मंत्र्याकडे करणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)

विश्रामगृहाच्या जागेवर बसस्थानक व्हावे व अडगळीत पडलेल्या बसस्थानकाच्या जागेवर सा.बां. विभागाचे विभागीय व विश्रामगृह व्हावे ही नागभीडकरांची मागणी आहे. ही मागणी रास्त आहे. या विषयावर संबंधित विभागाच्या बैठकी झाल्या आहेत. त्यात सकारात्मक विचार विनिमय झाला. आत २४ मे रोजी संबंधित सुपूर्ण विभागाची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होत आहे. विश्रामगृहाच्या (सा.बां.) जागेवर बसस्थानक व्हावे, यासाठी आपण जातीने पाठपुरावा करणार आहोत.
- कीर्तीकुमार भांगडिया, आमदार, चिमूर

Web Title: Movements for bus station movements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.