शाळा सुरू करण्याच्या हालचाली, मग महाविद्यालये का नाहीत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:20 AM2021-07-15T04:20:37+5:302021-07-15T04:20:37+5:30
चंद्रपूर : मागील दीड वर्षापासून कोरोना संकटामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान, शासनाने ...
चंद्रपूर : मागील दीड वर्षापासून कोरोना संकटामुळे शाळा, महाविद्यालये बंद आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान, शासनाने आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, महाविद्यालयाचे काय, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाने कोरोनामुक्त गावात आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता हे वर्ग सुरू होणार आहेत. दुसरीकडे महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला तरीही प्रत्येक विद्यार्थ्यांना तो सोयीचा नाही, तर काही गावांत नेटवर्कची समस्या आहे. त्यामुळे अभ्यास करण्याचा प्रश्न आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून, त्यांना आता भविष्याची चिंता लागली आहे. शाळांप्रमाणे महाविद्यालये सुरू व्हावीत, अशी प्राचार्य, प्राध्यापकांची इच्छा आहे; पण आदेश देणे शासनाच्या हातात असल्याने सर्वांचाच नाइलाच झाला आहे.
बाॅक्स
प्राध्यापक काय म्हणतात.....
-कोट
कोरोना संकटामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. विद्यार्थ्यांविना प्राध्यापकांना
महाविद्यालयात बोलाविले जात आहे. आता कोरोना संकट काही प्रमाणात कमी झाल्यामुळे शाळांप्रमाणे महाविद्यालये सुरू केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान टळेल.
-प्रा. राजश्री मार्कंडेवार
आरएमजीएम, सावली
कोट
मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे शाळा, काॅलेज बंद आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. मात्र, संकट मोठे असल्यामुळे प्रत्येकाचाच नाइलाज झाला. आता कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहे. त्यामुळे इतर सर्वांप्रमाणे महाविद्यालये सुुरू करावीत.
-योगेश दुधपचारे
जनता महाविद्यालय, चंद्रपूर
-
विद्यार्थी प्रतीक्षेत
महाविद्यालय बंद आहे. मात्र, ऑनलाइन वर्ग सुरू आहे. यातून व्यवस्थितपणे आकलन होत नाही. त्यामुळे शाळांप्रमाणे महाविद्यालये सुरू करायला पाहिजे.
-धम्मदीप बोरकर
कोट
आभासी पद्धतीने शिक्षण सुरू आहे. मात्र, प्रत्यक्ष प्राध्यापकांनी शिकविलेले विषय चांगल्या प्रकारे समजतात. अनेक वेळा नेटवर्क नसते. अशावेळी अभ्यासक्रमामध्ये खंड पडतो.
-प्रद्युत डोहणे