संत परंपरेचा सुधारणावादी वारसा अंनिसद्वारे गतिमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 12:57 AM2017-10-12T00:57:05+5:302017-10-12T00:57:21+5:30
आजच्या अर्थकेंद्री व व्यक्तिकेंद्री सामाजिक वातावरणामध्ये आधीच वेगवेगळ्या अंधश्रध्दांच्या प्रभावात जगणारा समाज पारपारिक अंधश्रध्दांसोबतच विविध आधुनिक अंधश्रध्दांना मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर: आजच्या अर्थकेंद्री व व्यक्तिकेंद्री सामाजिक वातावरणामध्ये आधीच वेगवेगळ्या अंधश्रध्दांच्या प्रभावात जगणारा समाज पारपारिक अंधश्रध्दांसोबतच विविध आधुनिक अंधश्रध्दांना मोठ्या प्रमाणात बळी पडत आहे. संतपरंपरेचा वारसा असणाºया पुरोगामी महाराष्ट्राची ही शोकांतिका आहे. आणि समाजाचे प्रबोधन करणाºया कार्यकर्त्यांचे निर्घृण खून होणे, ही महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाला आणि संत परंपरेचा वारसा असणाºया सुधारवाणी राज्यासाठी चिंता आणि चिंतणाची बाब आहे. तरी पण संतपरंपरेचा सुधारणावादी वारसा अंनिस पुढे नेत आहे. आणि ते अविरत सुरू राहील असे प्रतिपादन अ.भा. अनिस राज्य संघटक दिलीप सोळंके यांनी व्यक्त केले.
अ.भा. अनिस बल्लारपूर शाखेच्या वतीने स्थानिक मारोतराव हजारे सभागृहात आयोजित एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे प्रमूख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.
अ.भा.अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप अडकिने यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या सदर शिबिराचे उद्घाटन अनिसचे विदर्भ संघटक हरीभाऊ पाथोडे यांच्या हस्ते पार झाले. याप्रसंगी अंनिसचे राज्य युवा संघटक पंकज वंजारे, जिल्हा संघटक अनिल दहागावकर, जिल्हा सचिव धंनजय तावाडे, जिल्हा प्रसिध्दीप्रमुख निलेश योगेश पाझारे, सिंदेवाही तालूका सचिव अनिल लोनबले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या शिबिरात अंनिसची देवधर्म विषयक भूमिका, जादूटोणा विरोधी कायदा परीचय, बुवाबाजी, चमत्कार आणि कायदा, भूत, देवी अंगात येणे आणि कायदा, तंत्रमंत्र, करणी, अघोरी प्रथा, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संत परंपरा, आदी विषयांवर दिलीप सोळके, हरीभाऊ पाथोडे, पंकज वंजारे,धनंजय तावाडे, अनिल दहागांवकर यांनी मार्गदर्शन केले. संचालन कल्पना देवईकर यांनी तर आभार चंद्रकांत पावडे यांनी मानले.