अर्थसंकल्पातून भारतीयांच्या 'निर्मल' आशा धुळीस मिळाल्या; खासदार बाळू धानोरकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2023 05:52 PM2023-02-01T17:52:25+5:302023-02-01T17:57:30+5:30

हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणा असून अंमलबजावणी नेहमीप्रमाणे शून्य आहे असे बाळू धानोरकर म्हणाले

MP Balu Dhanorkar criticizes central government over the union budget 2023 | अर्थसंकल्पातून भारतीयांच्या 'निर्मल' आशा धुळीस मिळाल्या; खासदार बाळू धानोरकरांची टीका

अर्थसंकल्पातून भारतीयांच्या 'निर्मल' आशा धुळीस मिळाल्या; खासदार बाळू धानोरकरांची टीका

Next

चंद्रपूर : देशातील जनतेचे जीवन बेहाल करणारे बजेट असून, मला पहा आणि फुले वहा असा प्रकार आहे. महागाई, बेरोजगारी, मजूर वर्ग, वाढती गरिबी याकडे लक्ष द्यायला पाहिजे होते. गरीबी व बेरोजगारी मुळे महागाईचे चटके गरिबांना जाणवत आहेत. प्रतिव्यक्ती उत्पन्न दुप्पट झाले पण कुणाचे? गरिबांचे की श्रीमंतांचे हे लक्षात घेतले पाहिजे. हा अर्थसंकल्प म्हणजे केवळ घोषणा अमलबजावणी नेहमीप्रमाणे शून्य आहे, अशी प्रतिक्रिया खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा हा आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा अर्थ संकल्प आहे. त्यामुळे आगामी निवडणुका लक्षात घेऊनच मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात वर्षभरात या घोषणा किती पूर्ण होतात, हे सर्वांनाच माहिती आहे. 

पायाभूत सुविधांच्या विकासाला ‘बूस्ट’, महामार्ग विस्तारासाठी २.७० लाख कोटी

अर्थमंत्र्यांनी देशात ५० नवीन विमानतळ उभारण्याची घोषणा केली. मात्र, मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चंद्रपूरचे विमानतळ अद्यापही पूर्ण झालेले नाही. केलेल्या घोषणा पूर्ण होत नसतील तर अशा अर्थसंकल्पाला काही अर्थ नाही, असेही खासदार बाळू धानोरकर म्हणाले.

विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प : सुधीर मुनगंटीवार

हा निवडणुकांसाठी केलेला लोकप्रिय अर्थसंकल्प नाही तर ज्यांना राष्ट्र प्रिय आहे, ज्यांना जनता प्रिय आहे, अशांनी तयार केलेला विकासाची सप्तपदी मांडणारा हा अर्थसंकल्प आहे. देशाला आत्मनिर्भर करणारा, भयमुक्त भारत,  भुकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत निर्माण करणारा, समतायुक्त भारत निर्माण करणारा, हम सब एक है या भावनेने मांडलेला हा अर्थसंकल्प देशाला वैश्विक परिप्रेक्ष्यात पुढे नेणारा आहे. नाले सफाई करणाऱ्या बांधवांपासून ते शेतकरी बांधवांच्या गरजांचा विचार करणारा, त्यांच्या सर्वांगीण उन्नतीचा विचार करणारा आणि त्याच वेळेस देशातील लाखो करोडो छोट्या उद्योजकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे.  

Web Title: MP Balu Dhanorkar criticizes central government over the union budget 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.