आर्थिकदृष्ट्या संपन्न माजी खासदारांची निवृत्ती रक्कम बंद करा; खा. बाळू धानोरकर यांची मागणी

By राजेश भोजेकर | Published: March 16, 2023 04:50 PM2023-03-16T16:50:22+5:302023-03-16T16:55:04+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठविले

MP Balu Dhanorkar demands to PM, Finance Minister to stop pension of those ex-MPs who financially well-off | आर्थिकदृष्ट्या संपन्न माजी खासदारांची निवृत्ती रक्कम बंद करा; खा. बाळू धानोरकर यांची मागणी

आर्थिकदृष्ट्या संपन्न माजी खासदारांची निवृत्ती रक्कम बंद करा; खा. बाळू धानोरकर यांची मागणी

googlenewsNext

चंद्रपूर : भारत सरकारच्या माध्यमातून राज्यसभा आणि लोकसभेच्या माजी खासदारांनानिवृत्ती वेतन लागू आहे. यामध्ये आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या अनेक व्यक्तींना निवृत्ती वेतनाचा लाभ दिला जात आहे. यामध्ये माजी खासदारांची आर्थिक स्थिती बघून निवृत्ती वेतन देण्यात यावी, अशी मागणी चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्रही पाठविले. 

भारतीय लोकसभा आणि राज्यसभेमध्ये एकूण 4796 माजी खासदार आहेत. त्यांना दरवर्षाला 50  कोटी रुपयांची रक्कम पेन्शनच्या माध्यमातून प्रदान केली जाते. यामध्ये जवळपास 300 माजी खासदारांचे आश्रित परिवार देखील सहभागी आहेत. माजी खासदारांना देण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतनामध्ये उद्योजक राहुल बजाज, संजय दालमिया, बहन मायावती, सिताराम येचुरी, मनी शंकर अय्यर, रेखा जी, चिरंजीव आणि अनेक मोठ्या श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या माजी खासदारांची निवृत्ती वेतनाची रक्कम बंद करण्यात यावी, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.

Web Title: MP Balu Dhanorkar demands to PM, Finance Minister to stop pension of those ex-MPs who financially well-off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.