खासदारांनी अधिकाऱ्यांना सुनावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 10:50 PM2019-06-27T22:50:05+5:302019-06-27T22:50:19+5:30
मागील दोन वर्षांपासून विदर्भात पॉवरग्रीड कंपनीच्या माध्यमातून टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. ज्यांच्या शेतात टॉवर उभारले गेले त्यांना अजूनही मोबदला देण्यात आला नाही. मोबदला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पॉवरग्रीड कंपनीच्या अधिकाऱ्यांना खासदार बाळू धानोरकर यांनी चांगलेच सुनावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : मागील दोन वर्षांपासून विदर्भात पॉवरग्रीड कंपनीच्या माध्यमातून टॉवर उभारणीचे काम सुरू आहे. ज्यांच्या शेतात टॉवर उभारले गेले त्यांना अजूनही मोबदला देण्यात आला नाही. मोबदला देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पॉवरग्रीड कंपनीच्या अधिकाऱ्यांना खासदार बाळू धानोरकर यांनी चांगलेच सुनावले.
यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा ते परळी, वरोरा ते करनुल येथे वीज वाहून नेण्याकरिता टॉवरची उभारणी केली जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चिमूर, राजुरा, यवतमाळ जिल्ह्यातील वणी, घाटंजी, आर्णी तालुक्यातील अनेक गावातील शेतकºयांच्या शेतात टॉवरची उभारणी केली जात अहे.
अनेक ठिकाणी टॉवर उभारणीचे काम पूर्ण झाले. ज्यांच्या शेतात टॉवरचे काम पूर्ण झाले त्यांना अद्याप मोबदला देण्यात आला नाही.
मोबदला देण्यास टाळाटाळ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी खासदार धानोरकर यांच्याकडे तक्रारी केल्या. या पार्श्वभूमीवर खासदार धानोरकर यांनी पॉवरग्रीड कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली. याप्रसंगी यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यासह कंपनीचे अधिकारी हजर होते. या बैठकीत शेतकऱ्यांच्या पिकांचे पूर्नमुल्यांकन करण्यात यावे, त्यांना योग्य मोबदला देण्यात यावा. टॉवरची उभारणी करताना साहित्याची वाहतूक करताना ज्या शेतातून वाहने जातात. त्याही शेतकºयांना मोबदला देण्यात यावी, टॉवर उभारणीचे काम झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मोबदला देण्याची मागणी खासदार धानोरकर यांनी केली.
याप्रसंगी माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्यासह यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकारी तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.