निकालात वरोराची मृणाल लाभे जिल्ह्यात टॉपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 05:00 AM2020-07-30T05:00:00+5:302020-07-30T05:00:58+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण ४७५ शाळांमधून ३० हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील २९ हजार ८४६ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. पैकी एकूण २७ हजार ५८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील तब्बल सहा हजार १५३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. ११ हजार १०६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. आठ हजार २८१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर दोन हजार ४९ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.

Mrinal Labhe tops the district in the result | निकालात वरोराची मृणाल लाभे जिल्ह्यात टॉपर

निकालात वरोराची मृणाल लाभे जिल्ह्यात टॉपर

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्याचा निकाल ९२.४४ टक्के : जिल्ह्यात यंदाही मुलींचीच बल्ले बल्ले

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी आॅनलाईन जाहीर करण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ९२.४४ टक्के लागला. वरोरा येथील लोकमान्य कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी मृणाल उमेश लाभे ही ९८.६० टक्के गुण घेत जिल्ह्यात पहिली आली आहे.
यासोबतच चंद्रपूर येथील विद्या विहार कॉन्व्हेंटची विद्यार्थिनी प्राची कुटे ही ९७.८० टक्के घेऊन जिल्ह्यात दुसरी आली आहे. तिला ४८९ गुण मिळाले आहेत. चंद्रपूर येथील लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाची दिशा अशोक साखरकर ही ९७.६० टक्के गुण घेऊन दुसरी आली आहे. तिला ४८८ गुण मिळाले आहेत. भद्रावतीच्या आर्डिनन्स फॅक्टरी स्कूलची विद्यार्थिनी मनस्वी संजय भरडकर ही ९७ टक्के गुण चवथी आली आहे. तिला ४८५ गुण मिळाले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण ४७५ शाळांमधून ३० हजार ९६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील २९ हजार ८४६ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले. पैकी एकूण २७ हजार ५८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील तब्बल सहा हजार १५३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. ११ हजार १०६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. आठ हजार २८१ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत तर दोन हजार ४९ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीच्या निकालात जिल्ह्याची टक्केवारी चांगलीच पुढे गेली आहे.

पोंभुर्णा निकालात अव्वल
यंदा निकालात चंद्रपूर तालुका वगळला तर ग्रामीण विद्यार्थ्यांनी शहरी विद्यार्थ्यांवर मात केल्याचे तालुक्यातील निकालावरून स्पष्ट होते. जिल्ह्यात पोंभुर्णा तालुक्याचा निकाल सर्वाधिक ९६.८४ टक्के आहे. या तालुक्यातील सात शाळांमधून ४१४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. पैकी ४११ विद्यार्थी परीक्षेला बसले. यातील ३९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भद्रावती तालुका यंदा ८८.९५ टक्के निकाल देऊन पिछाडीवर गेला.

निकालात पुन्हा गर्ल्स शायनिंग
मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी दहावीच्या परीक्षेत आपल्या हुशारीची चुणूक दाखविली. दहावीच्या परीक्षेत एकूण १५ हजार ६४९ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील १५ हजार ४८० मुले परीक्षेला बसली. यातील १३ हजार ९९७ मुले उत्तीर्ण झालीे. उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९०.४२ आहे. यासोबतच एकूण १४ हजार ४४७ मुलींनी परीक्षेसाठी नोंदणी केली. यातील १४ हजार ३६६ मुलींनी परीक्षा दिली. पैकी १३ हजार ५९२ मुली उत्तीर्ण झाल्या. उत्तीर्ण मुलींची टक्केवारी ९४.६१ आहे.

विद्यार्थी गुंतले मोबाईलमध्ये
सध्या कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात लॉकडाऊनची सुरू आहे. त्यामुळे दुकाने सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू आहेत. याशिवाय कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी इंटरनेट कॅफेमध्ये निकाल पाहण्यासाठी जाणे पसंत केले नाही. बहुतेक विद्यार्थ्यांना आपल्या मोबाईलमध्ये निकाल पाहिला. यानिमित्त बरीच मुले मोबाईलमध्ये गुंतून होती.

पुनर्परीक्षार्थ्यांचा निकाल ८४.४९ टक्के
दहावीच्या परीक्षेत पुनर्परीक्षार्थ्यांचा (रिपीटर) निकाल ८४.४९ टक्के लागला आहे. एकूण चार हजार १९३ विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता नोंदणी केली. यातील चार हजार १५२ विद्यार्थी परीक्षेला बसले. यापैकी तीन हजार ३८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ८४.४९ आहे. विशेष म्हणजे, पुनर्परीक्षार्थ्यांमध्ये तब्बल १३ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. तर ५७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.

२६ टक्क्यांनी वाढला निकाल
मागील वर्षी चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ६५.५८ टक्के लागला होता. मात्र यावर्षी निकालाची टक्केवारी चांगलीच वाढली आहे. यंदा जिल्ह्याचा निकाल ९२.४४ टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल २६.८६ टक्क्यांनी निकाल वाढला.

Web Title: Mrinal Labhe tops the district in the result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.