महावितरणचा ४ हजार ५८५ वीज ग्राहकांना शाॅक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:40 AM2021-02-26T04:40:49+5:302021-02-26T04:40:49+5:30
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले. या काळात मोठ्या संख्येने ग्राहकांनी वीजबिल थकविले. विशेष म्हणजे, जे ग्राहक दर ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले. या काळात मोठ्या संख्येने ग्राहकांनी वीजबिल थकविले. विशेष म्हणजे, जे ग्राहक दर महिन्यात वीजबिल भरत होते. त्यांनीही काही राजकीय पक्षांच्या भूमिकांमुळे बिल माफ होईल या आशेपोटी बिल भरणे टाळले. दरम्यान, यासाठी विविध आंदोलनेही झाली. मात्र, सरकारने आजपर्यंत यावर कोणताही तोडगा काढला नाही. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या बिलाचा भर पडत ग्राहकांवर सद्यस्थितीत हजारो रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. त्यामुळे महावितरणने आता सक्त पाऊल उचलले असून थकबाकीदारांची वीज कट करण्याचा सपाटा सुरू केला आहे. यासाठी महावितरणला वरिष्ठांकडून २८ फेब्रुवारीपर्यंत वसुली करण्याचे सक्त आदेश आले आहे. दरम्यान, २४ फेब्रुवारीपर्यंत चंद्रपूर परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा एकंदरीत ४ हजार ५८५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यात चंद्रपूर मंडळातील ३ हजार ३५८ घरगुती, १०५८ वाणिज्यिक व १६९ औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे.
बाॅक्स
वीजपुरवठा खंडित करण्यात आलेले ग्राहक
चंद्रपूर परिमंडळ
१४९१ घरगुती
७६७ वाणिज्यिक
११४ औद्योगिक ग्राहक
बाॅक्स
४६ हजार ८७९ ग्राहकांनी थकविले बिल
एप्रिल २०२० पासून २४ फेब्रुवारीपर्यंत चंद्रपूर परिमंडळातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा एकंदरीत ८८ हजार २१४ ग्राहकांनी ७० कोटींचा २० लाखांचा भरणा केला नाही. चंद्रपूर मंडळातील ४६ हजार ८७९ हजार ग्राहकांनी ४४ कोटी ५० लाख व गडचिरोली मंडळातील ४१ हजार ३३५ ग्राहकांनी २५ कोटी ८० लाख भरले नाहीत.
बाॅक्स
२८ हजार ग्राहक वाचले
मागील दहा महिन्यांपासून एकही वीजबिल न भरलेल्या ग्राहकांपैकी २८ हजार २८ ग्राहकांनी २३ कोटी ७० लाखांच्या वीजबिलाचा भरणा केला. त्यामुळे या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होण्यापासून वाचला आहे.
कोट
सर्व थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत अशा थकबाकीदारांनी वीजबिलांचा भरणा करून महावितरणला सहकार्य करावे.
- सुनील देशपांडे
मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ