मुडझा, मानोऱ्यात डेंग्यूची साथ
By admin | Published: June 14, 2014 11:29 PM2014-06-14T23:29:04+5:302014-06-14T23:29:04+5:30
बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथे एकाचा तर ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा येथे डेंग्यू दोघांचा मृत्यू झाला. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून अनेक रुग्ण उपचार घेत आहेत.
गांगलवाडी, कोठारी : बल्लारपूर तालुक्यातील मानोरा येथे एकाचा तर ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा येथे डेंग्यू दोघांचा मृत्यू झाला. यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून अनेक रुग्ण उपचार घेत आहेत.
मुडझा येथील अजय अशोक राऊत, देविदास मुळे अशी मृतांची नावे आहेत. विलास बांबोळे, बालू बांबोळे, जिजाबाई दिवटे यांच्यावर नागपूर येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर तुकाराम कवडू तोमटी, प्रमोद दादाजी पाल, भारती चिमूरकर, सुषमा मधुकर रोहणकर, प्रभा उरकुडे व अन्य दोघे ब्रह्मपुरी येथील विविध रुग्णालयात दाखल आहेत.
मानोरा येथे आजाराने गावात डेंग्यु तापाने थैमान घातले असून एक महिन्याच्या कालावधीत दोघे दगावले आहे. यामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. रितेश पिपरे नामक मुलगा चंद्रपूर येथे उपचारादरम्यान दगावला. मागील महिना भरापासून मानोरा, कवडजई, इटोली, आसेगाव आदी गावात डेंग्यु तापाची साथ सुरू आहे. गावात आरोग्य विभागाने वेगवेगळे आरोग्य शिबिर लावून गावकऱ्यांची तपासणी केली. मात्र त्यात डेंग्युचे प्रमाण कमी होते. परंतु तापाची साथ काही प्रमाणात आढळून आली. एक महिन्यापूर्वी ताऊ सातपूते (७०) मानोरा या इसमाचा डेंग्युने मृत्यू झाला. शुक्रवारी रितेश पिपरे नामक मुलास रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत डेंग्यु सदृश्य ताप असल्याचे आढळून आले. दरम्यान दिनेश दगावला. यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)