ग्रॅपलिंग चॅम्पियनशिपमध्ये मुकेश पांडेला सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:54 AM2021-03-04T04:54:25+5:302021-03-04T04:54:25+5:30

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात सीपीबीएफआयला सुरुवात चंद्रपूर : डॉ. आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर व बजाज फीनसर्व यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सकाळी ...

Mukesh Pandey wins gold in grappling championship | ग्रॅपलिंग चॅम्पियनशिपमध्ये मुकेश पांडेला सुवर्णपदक

ग्रॅपलिंग चॅम्पियनशिपमध्ये मुकेश पांडेला सुवर्णपदक

Next

डॉ. आंबेडकर महाविद्यालयात सीपीबीएफआयला सुरुवात

चंद्रपूर : डॉ. आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर व बजाज फीनसर्व यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी सकाळी ११ व्या सीपीबीएफआय कोर्सचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर तर प्रमुख अतिथी म्हणून अमृता नेवल उपस्थित होते. संचालन प्रा. नंदकिशोर रंगारी तर आभार प्रा. मनोज वारजुरकर यांनी मानले.

गुरुदेव सेवा मंडळाचा पाठिंबा

चंद्रपूर : रामाळा तलाव प्रदूषणमुक्त करणे व संवर्धनाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या इको-प्रोच्या आंदोलनाला अ. भा. श्री. गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. यासंदर्भात सेवाधिकारी ॲड. दत्ता हजारे, प्रचार प्रमुख दादाजी नंदनवार, मुन्ना जोगी, धनराज चौधरी, मारोती कावटे आदींनी पत्र दिले.

चंद्रपुरात काव्यसंग्रहाचे प्रकाशन

चंद्रपूर : उलगुलान साहित्य मंच चंद्रपूरतर्फे आयोजित ब्रह्मानंद मडावी रचित ‘आपण कोणत्या देशात राहतो’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा श्रमिक पत्रकार संघ येथे पार पडला. दुसऱ्या सत्रात काव्य संमेलन पार पडले. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त सनदी अधिकारी प्रभू राजगडकर तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. नीलकांत कुलसंगे, धर्मराव पेंदाम, कुसुम अलाम आदी उपस्थित होते. प्रास्ताविक भोलाजी मडावी, संचालन प्रा. रेवनदास शेडमाके तर आभार भैय्याजी उइके यांनी मानले.

पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध

चंद्रपूर : केंद्र शासनाने पेट्रोल, डिझेल व सिलिंडर दरवाढीचा महाराष्ट्र ऑटो-रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे निषेध करण्यात आला. सततच्या दरवाढीने ऑटोचा व्यवसाय डबघाईस आला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल दरवाढ मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, ग्रामीण अध्यक्ष बाळू उपलंचीवार, ऑटोरिक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर राऊत, सचिव सुनील धंदरे आदींनी दिला आहे.

गुरुदेव सेवा मंडळातर्फे कार्यक्रम

चंद्रपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५२ व्या पुण्यस्मरण व शिवरायांच्या जयंतीनिमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळ वेडलीतर्फे दोन दिवसीय कार्यक्रम पार पडला. यावेळी राष्ट्रसंतांच्या प्रतिमेची व शिवरायांच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी जिल्हा सेवाधिकारी ॲड. दत्ता हजारे, ग्रामगीताचार्य दादाजी नंदनवार, धनराज चौधरी, मारोती कापटे, मुकुंदा चौधरी आदी उपस्थित होते.

नेहरू युवा केंद्रातर्फे कार्यक्रम

चंद्रपूर : नेहरू युवा केंद्र चंद्रपूर आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकारतर्फे राजीव गांधी महाविद्यालय चंद्रपूरच्या वतीने युवकांसाठी एक दिवसी राष्ट्रीय युवा नेतृत्व व पडोस युवा सांसद कार्यक्रम नुकताच पार पडला. उद्घाटन पाणी फाऊंडेशनचे राज्य प्रशिक्षक दिलीप देवतळे, प्रा. व्ही. पी. भांदककर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रा. अंजुम कुरेशी, प्रा. दिवाकर चौधरी, प्रा. जनार्दन पिंपळकर, सतीश गोखरे आदी उपस्थित होते.

मराठा सेवा संघातर्फे व्याख्यान

चंद्रपूर मराठा सेवा संघातर्फे शिवजयंतीनिमित्त ‘छत्रपती शिवाजी महाराज व आजचा संघर्ष’ या विषयावर व्याख्यान कार्यक्रम पार पडला. उद्घाटन ॲड. विजय मोगरे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी इंजि. दीपक खामणकर तर प्रमुख पाहुणे म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक राजेंद्र खाडे, सेवानिवृत्त वनसंरक्षक संजय ठाकरे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष वनिता गाडगे आदी उपस्थित होते.

ऊर्जानगर-बल्लारपूर बससेवा सुरू करावी

चंद्रपूर : ऊर्जानगर ते बल्लारपृूर या मार्गावर अत्यल्प बससेवा असल्याने प्रवाशांना बराच वेळ ताटकळत राहावे लागते. त्यामुळे बल्लारपूर-ऊर्जानगर बससेवा सुरू करावी, अशी मागणी दिनकर म्हशाखेत्री यांनी केली आहे. या मार्गावर शालेय विद्यार्थी व इतर नागरिक प्रवास करतात. मात्र बसअभावी त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात प्रशिक्षण शिबिर

चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर अंतर्गत मामला बफर झोन येथे ईअर्स संस्थेतर्फे गाईड प्रशिक्षण शिबिर नुकतेच पार पडले. या प्रशिक्षणात वन व वन्यजीव बचावाकरिता प्रशिक्षण देण्यात आले. पर्यटनाकरिता पर्यटकांशी संवाद कसा करावा, तंबाखूमुक्त पर्यटन याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सौरभ डोंगरे, उदय पटेल आदी उपस्थित होते.

Web Title: Mukesh Pandey wins gold in grappling championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.