मुक्ताई धबधबा पर्यटकांनी फुलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 22:24 IST2019-08-11T22:21:31+5:302019-08-11T22:24:46+5:30
चिमूर तालुक्यातील डोमा येथील निसर्गाच्या हिरव्या वनराईने नटलेल्या मुक्ताई धबधबा पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले असून मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करीत आहेत. मात्र येथे येणाऱ्या काही पर्यटकांकडून पर्यावरणाला नुकसान होइल, असे कृत्य केले जाते.

मुक्ताई धबधबा पर्यटकांनी फुलला
लोकमत न्यूज नेटवर्क
शंकरपूर : चिमूर तालुक्यातील डोमा येथील निसर्गाच्या हिरव्या वनराईने नटलेल्या मुक्ताई धबधबा पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र बनले असून मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करीत आहेत. मात्र येथे येणाऱ्या काही पर्यटकांकडून पर्यावरणाला नुकसान होइल, असे कृत्य केले जाते. पर्यावरण आणि आदिवासींच्या प्रेरणास्थळाच्या संरक्षणासाठी युवकांनी सहकार्य करावे, असे आवाहन विरांगणा मुक्ताई आदिवासी सेवा चारिटेबल ट्रस्ट आणि माना जमात विद्यार्थी युवा संघटनेने केली आहे.
नागभीड - चिमूर तालुक्यातील सात बहिणी डोंगराच्या कुशीत वसलेल्या डोमा येथे मुक्ताई धबधबा आहे. याठिकाणी संपूर्ण विदर्भातून पर्यटक येत असतात. येथील निसर्ग आणि धबधब्याचा आनंद घेतात. याच ठिकाणी आदिवासींचे श्रद्धास्थान विरांगणा मुक्ताई देवस्थान आहे. या प्रेरणा स्थळावर डोमावासी आणि लाखो आदिवसींची श्रद्धा आहे. हा भाग जंगलात असल्याने वन्यप्राणी आणि पक्षी यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने संवदेनशील आहे. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीने तसे बेजबाबदारपणे वागण्याने या प्रेरणास्थळाची विनाकरण बदनामी होत असल्याने समोर आलले आहे. आदिवासींच्या व डोमा वासियांना याच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
पर्यटकांवर स्वयंसेवक व पोलिसांची नजर
मुक्ताई देवस्थान समिती व स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदीतने उन्माद माजवणाऱ्या पर्यटकांच्या नियंत्रणासाठी पावले उचलली आहे. मुक्ताई ट्रस्टचे स्वयंसेवक व पोलीस येथे पहारा देत आहे. मुक्ताई ट्रस्टच्या वतीने पर्यटकांकडून कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता सूचना फलक लावले आहे. पर्यटकांना निसर्ग व धबधब्याचा आनंद घेण्यासाठी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० पर्यंत कालावधी ठरवलेला आहे. पर्यटकांनी धबधब्याजवळ स्वयंपाक करू नये. धोकादायक ठिकाणी सेल्फी घेऊ नये. प्लास्टिक व इतर वापराच्या वस्तू कचराकुंडीत टाकूर परिसर स्वच्छ ठेवा, असे आवाहन सूचना मुक्ताई ट्रस्टचे अध्यक्ष रामराव नन्नावरे यांनी केले आहे.