मूल तालुक्यात कॉंग्रेस, भाजपाचा प्रत्येकी आठ ग्रा.पं.वर कब्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:26 AM2021-02-07T04:26:49+5:302021-02-07T04:26:49+5:30

मूल : मूल तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींपैकी १८ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच पदाची निवडणूक शनिवारी पार पडली. यात १८ ग्रामपंचायतींपैकी काँग्रेसने आठ, ...

In Mul taluka, Congress and BJP occupy eight Gram Panchayats each | मूल तालुक्यात कॉंग्रेस, भाजपाचा प्रत्येकी आठ ग्रा.पं.वर कब्जा

मूल तालुक्यात कॉंग्रेस, भाजपाचा प्रत्येकी आठ ग्रा.पं.वर कब्जा

Next

मूल : मूल तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींपैकी १८ ग्रामपंचायतींच्या सरपंच-उपसरपंच पदाची निवडणूक शनिवारी पार पडली. यात १८ ग्रामपंचायतींपैकी काँग्रेसने आठ, भाजपाने आठ, शिवसेनेने एक तर ग्रामविकास आघाडीने एक ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे.

निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंचामध्ये केळझर ग्रामपंचायत- काजू मिलिंद खोब्रागडे हे सरपंच तर गुरूदास नामदेव ठाकरे हे उपसरपंच झालेत. विरई ग्रा.पं.- भास्कर तुकाराम वाढई सरपंच तर विभा बलराम उराडे उपसरपंच, नलेश्वर- मनीषा प्रदीप तावाडे सरपंच तर कीर्तीवर्धन शेंडे उपसरपंच, नवेगाव भुजला- यशवंत खोब्रागडे सरपंच तर प्रोफेसर सत्रे उपसरपंच, गोवर्धन- गोपीताई जाधव सरपंच तर सुरेंद्र मडावी उपसरपंच, बोरचांदली- ललिता ठेमस्कर सरपंच तर हरिभाऊ येनगंटीवार उपसरपंच, दाबगाव मक्ता- योगिता नितेश गेडाम सरपंच तर अतुल आनंदराव बुरांडे उपसरपंच.

कोसंबी-

रवींद्र किसन कामडी सरपंच तर सारिका ईश्वर गेडाम उपसरपंच, जानाळा-रंजना रविशंकर भोयर सरपंच तर दर्शना राजेंद्र किनाके उपसरपंच, चिरोली-मीनल लेनगुरे सरपंच तर मुक्तेश्वर सोयाम उपसरपंच, जुनासुर्ला- रणजित समर्थ सरपंच तर खुशाल टेकाम उपसरपंच, पिपरी दीक्षित- श्वेता उरकुडे सरपंच तर देवराव पिपरे उपसरपंच, मुरमाडी- रेवता मडावी सरपंच तर रघुनाथ गावडे उपसरपंच, गांगलवाडी-

वासुदेव वाघ सरपंच तर नंदू मेश्राम उपसरपंच, फिस्कुटी- नितीन रुपेशवर गुरनुले सरपंच राकेश रमेश गिरडकर उपसरपंच, चिमढा- कालिदास जयराम खोब्रागडे सरपंच तर योगेश काशीनाश लेनगुरे उपसरपंच, भवराळा-वैशाली राजेंद्र चौधरी सरपंच तर रमेश साधू शेंडे उपसरपंच, मोरवाही- अनुराधा प्रवीण नेवारे सरपंच तर वर्षा प्रमोद आरेकर उपसरपंच, बोरचांदली येथे काँग्रेसचे सरपंच तर भाजपाचे उपसरपंच निवडून आले आहेत.

Web Title: In Mul taluka, Congress and BJP occupy eight Gram Panchayats each

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.