मुनगंटीवार हे विकासाप्रती समर्पित
By admin | Published: July 31, 2016 01:49 AM2016-07-31T01:49:56+5:302016-07-31T01:49:56+5:30
ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबविले ...
चंद्रपुरात महारक्तदान: बल्लारपुरात नेत्रचिकित्सा तर दुर्गापुरात दंतचिकित्सा शिबिर
चंद्रपूर : ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने अनेक लोककल्याणकारी उपक्रम राबविले . गेली २० वर्षे राजकीय व सामाजिक क्षेत्रात लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी लक्षणीय कामगिरी केली आहे. महाराष्ट्राचे वित्त, नियोजन आणि वनमंत्री म्हणून त्यांनी अनेक लोकहिताचे निर्णय घेतले आहेत. वन विभागाच्या माध्यमातून दोन कोटी वृक्ष लागवडीची महामोहीम राबवून त्यास लोकचळवळीचे स्वरूप त्यांनी दिले आहे. विकासाप्रती समर्पित या लोकनेत्याच्या वाढदिवसाप्रित्यार्थ रक्तदान करुन शुभेच्छा देणाऱ्या सर्व ५८९ रक्तदात्यांचे मी भाजपातर्फे आभार मानतो, असे प्रतिपादन भाजपा महानगर अध्यक्ष आ. नाना शामकुळे यांनी केले.
शनिवारी कस्तुरबा चौक येथे वित्त, नियोजन, वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त महानगर भाजपातर्फे आयोजित महारक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी महापौर राखी कंचर्लावार, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा वनिता कानडे, महानगर महामंत्री रामपाल सिंह, राजेंद्र आडेपवार, अनिल फुलझेले, नगरसेविका अंजली घोटेकर, राहुल पावडे, भाजपा नेते राजू गोलीवार, तुषार सोम, नामदेव डाहुले, ब्रीजभूषण पाझारे आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)
दुर्गापूर येथे दंत चिकित्सा शिबिर
ना. मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन दुगापूूर येथील मोडक सभागृहात दंत चिकीत्सा शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी दंत चिकित्सक डॉ. मुंदडा यांनी किमान ४५० रूग्णांची तपासणी केली. या शिबिराचे उद्घाटन भाजपा महानगर महामंत्री रामपाल सिंह व जि. प. सदस्य शांताराम चौखे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फारूख शेख, श्रीनिवास जंगम, हनुमान काकडे, रंजना किन्नाके, माला रामटेके, देवानंद थोरात आदींनी परिश्रम घेतले.