मुनगंटीवार, आत्राम, सप्रे, आर्इंचवार यांना पुरस्कार घोषित
By admin | Published: January 12, 2017 12:36 AM2017-01-12T00:36:39+5:302017-01-12T00:36:39+5:30
लोकसेवा आणि विकास संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा बुधवारी करण्यात आली.
चंद्रपूर : लोकसेवा आणि विकास संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा बुधवारी करण्यात आली. यात जिल्ह्यातील चार जणांना पुरस्कार घोषित झाले. १४ जानेवारीला सकाळी ११ वाजता स्थानिक सरदार पटेल महाविद्यालयाच्या सभागृहात या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.
हे आहेत पुरस्काराचे मानकरी
ना. सुधीर मुनगंटीवार. ना. सुधीर मुनगंटीवार हे केवळ चंद्रपूर नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या गौरवाचे प्रतिक आहेत. १९७९ साली सरदार पटेल महाविद्यालय छात्रसंघाचे सचिव म्हणून ते निवडूण आले. आणि वयाच्या अवघ्या अवघ्या १७ वर्षापासून त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. १९८१ साली महाराष्ट्र भाजपचे सचिव पद त्यांच्याकडे आले. सतत पाचवेळा ते आमदार म्हणून निवडून आले. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात अर्थ व नियोजन आणि वनमंत्री हा महत्वाचा पदभार ते सांभाळत असून यापूर्वी पर्यटन मंत्री म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला आहे.
भाग्यश्री आत्राम. राजघराण्याचा वारसा लाभलेल्या भाग्यश्री आत्राम या आत्राम घराण्याचा चौथ्या पिढीचा वारसा चालवित आहेत. अहेरी, गडचिरोलीसारख्या शैक्षणिक, सामाजिक दृष्टीने अत्यंत मागासलेल्या भागात राहून या भागातील लोकांच्या विकासासाठी कटीबद्ध आहेत. जिल्हा परिषद गडचिरोलीच्या त्या माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्या आहेत. गडचिरोली राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा आहेत.
डॉ. विजय आर्इंचवार. नव्याने स्थापन झालेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे प्रथम कुलगुरु होण्याचा सन्मान म्हणजे चंद्रपूर- गडचिरोली क्षेत्रात डॉ. विजय आईंचवार दिलेल्या शैक्षणिक सामाजिक कार्याचे फलीत होय. सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथील प्राध्यापक पदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करुन पुढे कर्तृतत्वाची - उत्तुंग झेप आहे. विद्यापीठातील विविध समित्यांवर त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे.
मनोहर सप्रे. व्यगचित्रकार, काष्ठशिल्पकला, विनोदी लेखन, उत्कृष्ठ वक्तृत्व व दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणून मनोहर सप्रे महाराष्ट्राला परिचित आहेत. जनता महाविद्यालयात चंद्रपूर येथे बावीस वर्ष ते प्राध्यापक होते. सातत्याने बावीस वर्ष रोज त्यांचे व्यंगचित्र प्रकाशित होत होते. याशिवाय विविध वृत्तपत्रातही त्यांची व्यंगचित्रे प्रकाशित झाली आहेत. त्यांची आठ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. जळावू लाकूड व बांबू यांच्यापासून विविध कलाकृती व शिल्प निर्मिती त्यांनी केली असून फ्रान्स, अमेरिकेसारख्या देशातही त्यांच्या कलाकृतीची प्रदर्शनी भरली आहे. (शहर प्रतिनिधी)