अतिक्रमणावर चालला मनपाचा बुलडोजर

By admin | Published: July 19, 2016 01:04 AM2016-07-19T01:04:52+5:302016-07-19T01:04:52+5:30

चंद्रपूर महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम तिव्रतेने सुरू केली आहे. या अंतर्गत आज सोमवारी येथील तंदूर

Municipal bulldozer on an encroachment | अतिक्रमणावर चालला मनपाचा बुलडोजर

अतिक्रमणावर चालला मनपाचा बुलडोजर

Next

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम तिव्रतेने सुरू केली आहे. या अंतर्गत आज सोमवारी येथील तंदूर हॉटेलसमोरील भंगार व्यावसायिकाने मोकळ्या जागेवर केलेले अतिक्रमण बुलडोजर चालवून मनपाने हटविले. यासोबतच रस्त्यावरील लोखंडी फलकेही तोडून रस्ता मोकळा केला.
रामनगर पोलीस ठाण्यापासून काही अंतरावर असलेल्या नजूल मोहल्ल्यातील सीट क्रमांक ७ व प्लॉट क्रमांक १० मध्ये रहमान खान नामक व्यक्तीने अतिक्रमण करून भंगाराचे दुकान थाटले होते.
मनपा प्रशासनाने त्यांना जागा रिकामी करण्यासाठी दोनवेळा नोटीस पाठविली. मात्र त्यांनी अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे आज मनपाचे अतिक्रमण विभाग प्रमुख सचिन माकोडे, अभियंता रवींद्र हजारे, रंगे आदी सदर जागेवर दाखल झाले व बुलडोजरच्या सहाय्याने संपूृर्ण अतिक्रमण हटविले. यासंदर्भात सचिन माकोडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर व्यक्तीने मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून दुकान थाटले होते, असे सांगितले. वारंवार नोटीस देऊनही अतिक्रमण न हटविल्याने आज बुलडोजर चालवावे लागले.
यासोबत आज रस्त्याच्या बाजुला ज्यांनी आपल्या व्यवसायाचे लोखंडी फलक लावले होते, तेदेखील तोडून रस्ता मोकळा करण्यात आला.
(शहर प्रतिनिधी)

रविवारी मुख्य मार्गावर दुकाने लागणार नाही
४रविवारी चंद्रपुरात मुख्य बाजारपेठ बंद असते. त्यामुळे छोटेमोठे व्यावसायिक या संधीचा फायदा घेत गांधी चौकपासून जयंत टॉकीज चौकापर्यंत रस्त्यावर दुकाने थाटतात. ग्राहकही आपल्या मनपसंत वस्तू घेण्यासाठी येथे गर्दी करतात. त्यामुळे वाहतूक प्रभावित होते. यावर आळा घालण्यासाठी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून बिनबा गेटकडे जाणाऱ्या मार्गावर व्यावसायिकांना दुकाने लावण्यास मनपाने बजावले आहे. मुख्य मार्गावर दुकाने लावू नये, अशी तंबीही मनपाने दिली आहे.

Web Title: Municipal bulldozer on an encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.