पालिकेकडे पाणी पुरवठ्याचे २८ लाख रूपये थकीत

By admin | Published: March 30, 2017 12:45 AM2017-03-30T00:45:52+5:302017-03-30T00:45:52+5:30

तपाळ पाणी पुरवठा योजनेचे संचालन करणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे नागभीड नगर परिषदेकडून २८ लाख १६ हजार ६४० रुपये घेणे आहेत.

Municipal corporation gets tired of Rs 28 lakhs of water supply | पालिकेकडे पाणी पुरवठ्याचे २८ लाख रूपये थकीत

पालिकेकडे पाणी पुरवठ्याचे २८ लाख रूपये थकीत

Next

नागभीड, नवखळा, चिखलपरसोडी गावांचा समावेश : उन्हाळ्यात पाणी पुरवठा होणार प्रभावित
नागभीड : तपाळ पाणी पुरवठा योजनेचे संचालन करणाऱ्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे नागभीड नगर परिषदेकडून २८ लाख १६ हजार ६४० रुपये घेणे आहेत. मात्र नगर परिषद हे पाणीकर वेळेवर अदा करीत नसल्याने पाणीपुरवठा विभागासमोरील अडचणी वाढल्या आहेत.
तपाळ पाणी पुरवठा योजनेमार्फत ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव (बुज) बोरगाव (खुर्द) तपाळ या ब्रह्मपुरी तालुक्यातील तर नागभीड, नवखळा, मोशी, चिखलपरसोडी, चिकमारा, देवटक, ढोरपा या नागभीड तालुक्यातील गावांना पाणी पुरवठा करण्यात येतो. या योजनेतील काही गावांची पाणी करवसुली समाधानकारक असली तरी नागभीड नगर परिषदेत अंतर्भूत असलेल्या नागभीड, नवखळा आणि चिखलपरसोडी या गावांनी पाणीकर वसुलीबाबत पाणी पुरवठा विभागाला चांगलाच ठेंगा दाखविला आहे.
तपाळ पाणी पुरवठा योजनेचे नागभीडमध्ये ७१० कनेक्शन आहेत. नवखळामध्ये २०७ तर चिखलपरसोडीमध्ये ४७ नळकनेक्शन आहेत. एका कनेक्शनचा वर्षभराचा दर ७१० रुपये आहे. २०१६-१७ या आर्थिक वर्षातील नागभीडकडे पाच लाख ५८ हजार १४४ रुपये तर यावर्षीची ४ लाख ८ हजार ९६० रूपये असे एकूण ९ लाख ६७ हजार १०४ रुपये, नवखळ्याकडे २०१५-१६ या आर्थिक वर्षातील १ लाख ६३ हजार २९६ रुपये, २०१६-१७ या वर्षातील १ लाख १९ हजार २३२ रुपये असे एकूण दोन लाख ८२ हजार ५२८ रुपये पाणीपुरवठा विभागाला घेणे आहेत. चिखलपरसोडीकडे २०१५-१६ या वर्षातील ३७ हजार १५२ रुपये तर २०१६-१७ या वर्षातील २७ हजार ७२ रुपये थकीत आहेत.
नागभीड नगर परिषदेअंतर्गत असलेल्या या तिन्ही गावाकडे २०१५-१६ या वर्षातील १३ लाख ४३ हजार ५२० रुपये तर २०१६-१७ या वर्षाचे पाच लाख ५५ हजार २६४ रुपये थकीत आहेत. या वसुलीबाबत पाणी पुरवठा विभागाने नागभीड नगर परिषदेला अनेकदा अवगत केले, असे पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र नगर परिषदेकडून नेहमीच थंड प्रतिसाद असतो, असेही या अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. या प्रकारामुळे पाणीपुरवठा योजनेच्या डागडुजी करण्याच्या कामासाठी अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांने सांगितले. त्यामुळे भविष्यात अडचणी उद्भवल्यास त्रास सहन करावा लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)

दोन लाख रुपये नुकतेच अदा करण्यात आले आहेत. पाणी पुरवठा विभागाकडून आलेल्या मागणीचा ताळमेळ जुळविण्यात येईल व पाणीकर वसुल झाल्यानंतर आणखी रक्कम अदा करण्यात येईल.
- मंगेश खवले, मुख्याधिकारी
न.प. नागभीड.

Web Title: Municipal corporation gets tired of Rs 28 lakhs of water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.