चिमुरातील सार्वजनिक विहिरीच्या जागेवरील अतिक्रमणाकडे पालिकेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:31 AM2021-08-19T04:31:22+5:302021-08-19T04:31:22+5:30
ही विहीर अतिवृष्टीने विहीर खचली होती. विहीर दुरुस्त करण्यासाठी वारंवार निवेदन देऊनही पालिकेने दुर्लक्ष केले. सार्वजनिक विहिरीचा ...
ही विहीर अतिवृष्टीने विहीर खचली होती. विहीर दुरुस्त करण्यासाठी वारंवार निवेदन देऊनही पालिकेने दुर्लक्ष केले. सार्वजनिक विहिरीचा प्लॉट राखीव असल्याने न.प.ने सुरक्षित ठेवण्यासाठी आवारभिंतीचे बांधकाम करावयास पाहिजे होते. ही संधी साधून सुधीर भोयर यांनी विहीर बुजवून त्या जागेवर तर हरिदास शिंदे यांनी कुंपण वाढवून अतिक्रमण केले. विहीर ही सुधीर भोयर यांच्या हद्दीत गेली. सार्वजनिक विहीर ही पिण्याच्या पाणीसाठी असल्याने महिलांना त्रास होत आहे. नगर परिषदने अतिक्रमण हटवून बुजलेली विहिरीचा उपसा करून राखीव प्लॉटचे सीमांकन करण्याची मागणी शकुंतला सावरकर, कौशल्या कुलमथे, कांता बंगारे, कुंदा सावसाकडे, आशा सावरकर, ज्योत्स्ना सावसाकडे अशा सुमारे ६० महिलांनी केली आहे. याबाबतचे निवेदन न.प. मुख्याधिकारी, पालकमंत्री विजय वड्डेटीवार, आमदार बंटी भांगडिया, जि.प. गट नेते डॉ. सतीश वारजूकर, एसडीओ व ठाणेदारांना निवेदन देण्यात आले आहे.
180821\img-20210818-wa0030.jpg
चिमूर नगर परिषद च्या पिंपळनेरी नवीन वस्तीच्या सार्वजनिक