महापालिका वसुंधरा अभियानातही अग्रेसर राहील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:32 AM2021-01-08T05:32:56+5:302021-01-08T05:32:56+5:30
आयुक्तांना विश्वास : वसुंधरा अभियानांतर्गत संवर्धनाची शपथ चंद्रपूर : शहराच्या पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन करण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे. ...
आयुक्तांना विश्वास : वसुंधरा अभियानांतर्गत संवर्धनाची शपथ
चंद्रपूर : शहराच्या पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन करण्याची जबाबदारी आपली प्रत्येकाची आहे. शासनाच्या वसुंधरा अभियानाच्या अनुषंगाने प्रत्येकाने सक्रिय व्हावे, असे आवाहन करीत चंद्रपूर शहर महानगरपालिका या अभियानातही अग्रेसर राहील, असा विश्वास आयुक्त राजेश मोहिते यांनी व्यक्त केला.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक झोनमध्ये ''''वसुंधरा अभियान'''' शपथ ग्रहण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सर्व कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात येत आहे. याप्रसंगी आयुक्त राजेश मोहिते यांच्यासह उपस्थित सर्वांनी निसर्गातील पृथ्वी, आकाश, जल, वायू, अग्नी या पंचतत्त्वांच्या संवर्धानासाठी दक्ष राहून कार्य करण्याची सामुहिक शपथ घेतली.
याप्रसंगी सर्व सहायक आयुक्त, स्वच्छता निरीक्षक प्रदीप मडावी, उदय मैलारपवार, भूपेश गोठे, विवेक पोतनूरवार, महेंद्र हजारे, अनिरुद्ध राजुरकर, अनिल ढवळे, संतोष गर्गेलवार, जगदीश शेंदरे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.