मनपाचा कारभार लवकरच चालणार नव्या इमारतीमधून

By admin | Published: August 25, 2014 11:54 PM2014-08-25T23:54:54+5:302014-08-25T23:54:54+5:30

चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा कारभार लवकरच गांधी चौकातील नवीन प्रशासकीय इमारतीमधून चालणार आहे. या नवनिर्मित प्रशासकीय इमारतीचे सोमवारी पालकमंत्री संजय देवतळे

The Municipal Corporation will soon start the new building | मनपाचा कारभार लवकरच चालणार नव्या इमारतीमधून

मनपाचा कारभार लवकरच चालणार नव्या इमारतीमधून

Next

चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेचा कारभार लवकरच गांधी चौकातील नवीन प्रशासकीय इमारतीमधून चालणार आहे. या नवनिर्मित प्रशासकीय इमारतीचे सोमवारी पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते थाटात उदघाटन झाले. अध्यक्षस्थानी महापौर संगिता अमृतकर होत्या.
नगरपालिका अस्तित्वात असतानाच या इमारतीच्या बांधकामाला मंजुरी मिळाली होती. तेव्हापासून इमारतीचे बांधकाम सुरू होते. यादरम्यान आधी नगरपालिका आणि आता महापालिकेचे कामकाज पालिकेच्या सातमजली इमारतीमधूनच चालत होते. आता या इमारतीचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. नवनिर्मित नगर सभागृहामध्ये १४० सदस्यांसोबत पत्रकारांनाही बसण्याची व्यवस्था आहे. सभागृहामध्ये चर्चेसाठी विशेष प्रोजेक्टरही लावण्यात आले आहे. या कार्यक्रमात चंद्रपूरचे आजपर्यंतचे माजी नगराध्यक्ष यांचाही सत्कार करण्यात आला. यात गयाचरण त्रिवेदी, रमेश कोतपल्लीवार, विजय राऊत, दीपक जयस्वाल, सुनिता लोढिया, बिताताई रामटेके, सुरेश महाकूळकर, मनोहर पाऊणकर व प्रभाकर पटकोटवार यांचा समावेश होता. या कार्यक्रमाचे औचित्य साधून चंद्रपूर पंचशताब्दीच्या निधीतून मंजूर झालेल्या पाईपलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजनही पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले.
नवनिर्मित प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हंसराज अहीर, आ. सुधीर मुनगंटीवार, आ. नाना श्यामकुळे, आ. सुभाष धोटे, आ. विजय वडेट्टीवार, आ. अतुल देशकर, आ. मितेश भांगडिया, आ. शोभाताई फडणवीस, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर, उपमहापौर संदीप आवारी, सभापती रितेश तिवारी आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The Municipal Corporation will soon start the new building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.