नगरपरिषदेचे ओटे ठरताहेत कुचकामी
By admin | Published: November 23, 2015 12:56 AM2015-11-23T00:56:52+5:302015-11-23T00:56:52+5:30
ब्रह्मपुरी शहरात शुक्रवारी बाजार भरतो. त्या ठिकाणी दैनंदिनी गुजरीसाठी बांधण्यात आलेले ओटे गुजरीच्या प्रतीक्षेत धूळ खात असून भिंती सुद्धा पडायला सुरुवात झाली आहे.
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी शहरात शुक्रवारी बाजार भरतो. त्या ठिकाणी दैनंदिनी गुजरीसाठी बांधण्यात आलेले ओटे गुजरीच्या प्रतीक्षेत धूळ खात असून भिंती सुद्धा पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जनतेच्या पैशाचा अपव्यय होत असल्याची प्रतिक्रया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
नगरपरिषदेच्या वतीने लाखो रुपये खर्च करून बाजार चौकात दैनंदिनी गुजरीसाठी भाजी विक्रेते, फळविक्रेते यांच्यासाठी ओटे बांधून त्यावर शेड घालण्यात आले आहे. बांधकाम पूर्ण होऊन सहा महिन्यापेक्षाही जास्त कालावधी झाला असूनही दैनंदिन गुजरी जुन्याच वस्तीच्या ठिकाणी भरत आहे. त्यामुळे बांधलेल्या ओट्यांची रंगरंगोटी, शेड व भिंती यांची अवस्था खराब होत असल्याने काही ओट्यांची भिंतही पडायला सुरुवात झाली आहे. या ओट्यांमध्ये रात्रीच्या वेळी मद्यप्राशन तसेच अनेक गैरकुत्यही होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे लाखो रुपये उपयोगिता विना वाया गेल्याचे आहे.
नगर परिषद प्रशासनाकडून याविषयीची दखल घेतल्या जात नसल्याने जनतेच्या लाखो रुपयांना वाऱ्यावर सोडल्या गेले आहे. अनेक भागात रस्ते, नाल्या अपूर्ण असताना लाखो रुपयांच्या वास्तूचा निरूपयोगी होत असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त केल्या जात आहे. बांधलेल्या ओट्यांचा लवकरात लवकर उपयोग करण्यात याव. (तालुका प्रतिनिधी)