मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केले काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:28 AM2021-07-31T04:28:23+5:302021-07-31T04:28:23+5:30

चंद्रपूर : महापाललिकेचे उपायुक्त विशाल वाघ यांना अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार काल महापौरांच्या चेंबरमध्ये घडल्यानंतर ...

Municipal officers and employees wore black ribbons | मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केले काम

मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून केले काम

Next

चंद्रपूर : महापाललिकेचे उपायुक्त विशाल वाघ यांना अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार काल महापौरांच्या चेंबरमध्ये घडल्यानंतर नगरसेवक संजय कंचर्लावार यांच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात शुक्रवारी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने काळ्या फिती बांधून काम केले. गुरुवारी महापालिकेत ऑनलाइन सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा सुरू असताना मनसेचे नगरसेवक सचिन भोयर हे रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन सभागृहात आले. दरम्यान, ऑनलाइन सभा सुरू असतानाच हा प्रकार घडला. त्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनी हातात बॅनर घेऊन निषेध नोंदविला. या प्रकारानंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला. दरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली. त्यानंतर महापौरांनी अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवार, तसेच उपायुक्त विशाल वाघ यांना चेंबरमध्ये बोलावून चर्चा करीत असताना नगरसेवक कंचर्लावार यांनी शिवीगाळ, तसेच धमकी दिल्याची तक्रार उपायुक्त वाघ यांनी पोलीस स्टेशनमध्ये केली. त्यानंतर महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, शुक्रवारी सकाळी अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त करीत स्वयंस्फूर्तीने हाताला काळ्या फिती लावून काम केले. यासंदर्भात महापालिकेतील काही कर्मचारी संघटनांना विचारणा केली असता, काळ्या फिती लावून काम करण्याबाबत संघटनेचा निर्णय नसून कर्मचारी, अधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने काळ्या फिती लावून काम केल्याचे सांगितले.

कोट

काल घडलेली घटना चुकीची होती. वेळेनुसार काही घटना घडत असतात. आज कर्मचारी, अधिकाऱ्यांनी यासंदर्भात आपली नाराजी व्यक्त करीत काळ्या फिती लावून काम केले.

-राजेश मोहिते,

आयुक्त, महापालिका चंद्रपूर

Web Title: Municipal officers and employees wore black ribbons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.