कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला पालिकाच जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:27 AM2021-05-23T04:27:11+5:302021-05-23T04:27:11+5:30
कोरोना नियंत्रणाबाबत जनजागृती,गावात निर्जंतुकीकरण तथा अन्य कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. घुग्घुस गावाची ४५ ...
कोरोना नियंत्रणाबाबत जनजागृती,गावात निर्जंतुकीकरण तथा अन्य कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. घुग्घुस गावाची ४५ हजारांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे. २० वर्षांच्या संघर्षानंतर घुग्घुस गावाला नगर परिषदेचा दर्जा मिळाला. प्रशासकपदी चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गौड यांची नियुक्ती केली; मात्र पूर्वीच अधिक व्यस्त असल्याने घुग्घुस कार्यालयाकडे ते फारसे येत नाहीत. त्यांनी प्रत्येक विभागाचे प्रमुख म्हणून तात्पुरती नेमणूक केली व त्यांच्या भरवशावर घुग्घुस गावाचे काम सुरू आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट भयानक आहे. झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. दिवसाआड एकाचा मृत्यू होत आहे. शेकडो लोक पॉझिटिव्ह असून गृहविलगीकरणात आहेत.
मात्र कोविडवर नियंत्रण मिळविण्याकरिता कोणत्याही प्रकारची उपाययोजना केल्या नाहीत. गावात मागील वर्षी ग्रामपंचायत असताना गावात फवारणी करण्यात येत होती; मात्र यावर्षी निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया ठप्प आहे. घुग्घुस नगरपरिषदेला कायम मुख्याधिकारी द्यावा, शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. गावात कोरोना नियंत्रण संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी तालुका मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष सत्यनारायण डकरे, संजय भालेराव, बुद्धराज कांबळे यांनी निवेदनातून केली आहे.