चंद्रपुरात मनपाने सुरू केले ‘थ्री आर’ सेंटर; चॅलेंज नाविण्यपूर्ण उपक्रम

By राजेश मडावी | Published: May 20, 2023 03:17 PM2023-05-20T15:17:30+5:302023-05-20T15:18:13+5:30

लोकोपयोगी संकल्पना : सलग २१ दिवस चॅलेंज नाविण्यपूर्ण उपक्रम

Municipality started 'Three R' Center in Chandrapur; Challenge Innovation | चंद्रपुरात मनपाने सुरू केले ‘थ्री आर’ सेंटर; चॅलेंज नाविण्यपूर्ण उपक्रम

चंद्रपुरात मनपाने सुरू केले ‘थ्री आर’ सेंटर; चॅलेंज नाविण्यपूर्ण उपक्रम

googlenewsNext

चंद्रपूर : केंद्र सरकारने ‘२१ दिवस चॅलेंज’ या अभिनव उपक्रमांतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ३ ‘थ्री आर’ सेंटर सुरु करण्यात आले. यातील चंद्रपुरातील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह पाण्याच्या टॉकीजवळ मनपा पाणी पुरवठा विभाग येथील ' थ्री आर ’ सेंटरचे उद्घाटन २० मे रोजी उपायुक्त अशोक गराटे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

केंद्र सरकारने ‘२१ दिवस चॅलेंज’ हा अभिनव उपक्रम १५ मे ते ०५ जून या कालावधीत राबविण्याचे जाहीर केले. यामध्ये ‘थ्री आर’ ही मुख्य संकल्पना आहे. ‘थ्री आर’ अर्थात कचरा कमी करणे, कचऱ्याचा पुनर्वापर करणे व कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करणे असून या उपक्रमातर्गत शहरामध्ये ‘थ्री आर’ सेंटर्स सुरू करणे व नागरिकांच्या सहयोगातून विविध उपक्रम राबविणे अपेक्षित आहे.  यात आपण जेवढा कचरा निर्माण करतो त्यात कपात करणे, ज्या गोष्टी फेकल्या गेल्या असत्या त्या वापरण्याचे नवीन मार्ग शोधणे तसेच जुने आणि निरुपयोगी (जसे, प्लास्टिकच्या वस्तू) काहीतरी नवीन आणि उपयुक्त (जसे. पिकनिक बेंच, खेळाच्या मैदानाची उपकरणे आणि रिसायकलिंग बिन) मध्ये बदलणे हा तीन आर संकल्पनेचा उद्देश आहे.

 असे आहे नियोजन

‘माझे जीवन, माझे स्वच्छ शहर’ हे घोषवाक्य घेऊन केंद्र सरकारमार्फत ‘२१ डेज् चॅलेंज ‘थ्री आऱ’ हा उपक्रम जाहीर केला गेला. उपक्रमांतर्गत नागरिक, लोकप्रतिनिधी, स्वच्छताकर्मी, सफाईमित्र, बचतगट, टुलिप इनर्टन्स, प्रसारमाध्यमांचा सहभाग घेतला जाणार आहे. उपक्रमाशी सुसंगत विविध प्रकारचे कार्यक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे. यावेळी पर्यावरणाकरिता सुयोग्य जीवनशैलीची शपथ सामुहिकरित्या घेण्यात आली, अशी माहिती मनपाचे उपायुक्त अशोक गराटे यांनी दिली.

कर्तव्य नागरिकांचे....

या सेंटरवर चांगल्या स्थितीतील कपडे, चादर, ब्लँकेट, भांडी,पुस्तके,खेळणी,पादत्राणे व इतर वस्तु या केंद्रात आणून देता येतील तसेच गरजू व्यक्तींना नेता येतील. या मोहिमेत उत्तम कार्य करणाऱ्या नागरिकांना बेस्ट सिटीझन पुरस्कार व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.  शिवाय लकी ड्रॉ काढून विजेत्यांना बक्षिसे देण्यात येईल.  अधिक माहितीसाठी थ्री आर सेंटर प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहाच्या मागे, पाणीची टाकी येथे, मूल रोड इंदिरा नगर येथे तसेच बेघर निवारा केंद्र आझाद गार्डन येथे संपर्क साधावा, असे आवाहन मनपाने केले.

Web Title: Municipality started 'Three R' Center in Chandrapur; Challenge Innovation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.