घरगुती वादातून भावाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:26 AM2021-07-26T04:26:23+5:302021-07-26T04:26:23+5:30
राजुरा : राजुरा शहरातील एके काळी दरारा असलेल्या सोमनाथपूर वाॅर्डात पुन्हा गुन्हेगारी डोके वर काढत आहे. घरगुती वादातून मोठ्या ...
राजुरा : राजुरा शहरातील एके काळी दरारा असलेल्या सोमनाथपूर वाॅर्डात पुन्हा गुन्हेगारी डोके वर काढत आहे. घरगुती वादातून मोठ्या भावाने लहान भावाची गळा आवळून हत्या केली. ही घटना रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली.
धीरज देवगडे (२५) रा. सोमनाथपूर असे मृतकाचे नाव आहे. धीरज देवगडे व त्याचा मोठा भाऊ सूरज देवगडे या दोघांमध्ये रविवारी घरगुती कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर मोठा भाऊ सूरज देवगडे याने लहान भाऊ धीरज देवगडे याचा गळा आवळून ठेवला. यातच त्याचा मृत्यू झाला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी आरोपी सूरज देवगडे याला अटक केली आहे. राजुराचे ठाणेदार चंद्रशेखर बहादूरे पुढील तपास करीत आहेत.
250721\img-20210725-wa0204.jpg
फोटो