अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या

By admin | Published: April 8, 2017 12:40 AM2017-04-08T00:40:08+5:302017-04-08T00:40:08+5:30

येथील अमराई वॉर्डामधील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील तीनही आरोपींना अटक करण्यात आली.

The murder of a minor girl | अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या

अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या

Next

तिघांना अटक : शेजारच्या युवकांनीच केला घात
घुग्घुस : येथील अमराई वॉर्डामधील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणातील तीनही आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील एक आरोपी अल्पवयीन असून तो मुलीच्या शेजारीच राहतो. न्यायालयाने त्या अल्पवयीन आरोपीला निरीक्षण कक्षात तर दोन आरोपींना १० एप्रिलपर्यत पोलीस कोठडी सुनावली.
बुधवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास अमराई वॉर्डातील मुलीचे कुटुंबीय रात्रीपासून मुलगी घरून बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी सकाळी १० वाजताच्या दरम्यान पोलीस ठाण्यात गेले. दरम्यान, त्याच वार्डामध्ये एका युवकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची तर कोळसा खाण क्षेत्रातील टॉवरजवळ मुलीचा मृत्यूदेह पडून असल्याची माहिती ठाण्यात आली. एकाच वेळी तीनही तक्रारी पोलीस ठाण्यात आल्याने मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार देणाऱ्या फिर्यादीला पोलिसांनी सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. तेव्हा सदर मृतदेह फिर्यादीच्या मुलीचा असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी तपासाची चक्रे त्या मुलीच्या घराशेजारी राहणाऱ्या व आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलाकडे केंद्र्रित केले. खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या त्या मुलाभोवती पोलिसांनी गराडा घातला व रात्री त्याला ताब्यात घेऊन पोलिसी हिसका दाखवताच खुनाचे रहस्य उलगडले. खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सामूहिक अत्याचार केल्यानंतर आपले कृत्य उघडकीस येऊ नये, म्हणून मुलीचे डोके दगडाने ठेचून तिची जागीच हत्या करण्यात आली. याप्रकरणी एक अल्पवयीन आरोपी व प्रताप रमेश सिंग व आकाश राहुल देवगडे रा. अमराई वॉर्ड यांच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३०२, ३७६,१२० ब १०२, बाल लौगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
पुढील तपास जिल्हा पोलीस उपअधीक्षक हेमराज राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय पोलीस अधिकारी सुशील नायक, चंद्रपूर गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे, घुग्घुसचे ठाणेदार पगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड, पोलीस उपनिरीक्षक छञपती चिडे हे करीत आहेत. (वार्ताहर)

मुलीच्या वडिलांना शिविगाळ
हा प्रकार दाबण्यासाठी अल्पवयीन मुलाच्या वडीलांकडून मुलीच्या वडीलांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्या घरी जाऊन शिविगाळ करून धमकी दिल्याने नागरिकांनी ठाणेदारांना भेटून आपला संताप व्यक्त केला व आरोपीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यामुळे अल्पवयीन आरोपीचे वडील रमेश सिंग यांच्या विरोधातही पोलिसांनी कारवाई केली.

Web Title: The murder of a minor girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.