शिर नसलेल्या निर्वस्त्र तरुणीची हत्या प्रकरण; रुममेटचा प्रियकर असलेला दुसरा आरोपीही एलसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2022 08:13 PM2022-04-12T20:13:43+5:302022-04-12T20:30:24+5:30

Chandrapur News काही दिवसांपासून गाजत असलेल्या शिर नसलेल्या निर्वस्त्र तरुणीच्या हत्येमागचा मुख्य आरोपी मंगळवारी पोलिसांच्या ताब्यात सापडला.

Murder of a headless young woman; Another accused, a roommate's boyfriend, was also caught by the LCB |  शिर नसलेल्या निर्वस्त्र तरुणीची हत्या प्रकरण; रुममेटचा प्रियकर असलेला दुसरा आरोपीही एलसीबीच्या जाळ्यात

 शिर नसलेल्या निर्वस्त्र तरुणीची हत्या प्रकरण; रुममेटचा प्रियकर असलेला दुसरा आरोपीही एलसीबीच्या जाळ्यात

Next

चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून गाजत असलेल्या भद्रावती येथील शिर नसलेल्या निर्वस्त्र तरुणीच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी मृत तरुणीची रूममेट विधिसंघर्षग्रस्त युवतीला ९ मार्च रोजी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले होते. तिचा सहकारी प्रियकर फरार होता. मंगळवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भद्रावती येथून त्याला अटक केली आहे. शंकर शेखर कुरवन (वय २६, रा. भद्रावती) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

४ एप्रिल रोजी भद्रावतीतील तेलवासा रोडवर एका तरुणीचा शीर नसलेला निर्वस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ माजली होती. मृत तरुणीची ओळख पटविणे पोलिसांसमोर आव्हान होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक बाबींचा तपास करून मृत तरुणी नागपूर रामटेक येथील असल्याचे शोधून काढले. तपासाअंती तिच्या रूममेटनेच अपमानाचा बदला घेण्यासाठी आपल्या प्रियकराच्या मदतीने तिला चंद्रपूर येथे बोलावून चाकूने तिचे शीर कापून हत्या केल्याचे समोर आले.

याप्रकरणी पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. तिचा प्रियकर हत्येनंतर परराज्यात फरार झाला होता, परंतु मंगळवारी सकाळी तो भद्रावती येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, पोलीस उपनिरीक्षक अतुल कावळे, हवालदार संजय आतकुलवार, संतोष दंडेवार, गोपाल अतकुलवार, गणेश भोयर, सायबर सेलचे मुजावर अली यांनी केली.

असे घडले हत्याकांड

मृत तरुणीला ३ एप्रिल रोजी नागपूरवरून चंद्रपूर येथे बोलाविण्यात आले. दरम्यान, शंकर कुरवन, त्याची प्रेयसी व मृत तरुणीने एका वाईन शाॅपमधून दारू घेतली. त्यानंतर वरोरा चौकातून ट्रिपल सीट साखरवाई मार्गाने सुमठाणाकडे निघाले. मधात त्यांनी दारू ढोसली. घटनास्थळावर गेल्यानंतर मृत तरुणी व विधिसंघर्षग्रस्त मुलगी यांच्यात वाद झाला. त्यातच चाकूने वार करून तिने तिची हत्या केली. त्यानंतर शीर कापून तिचे कपडे व साहित्य एका स्कार्फमध्ये गुंडाळून चंद्रपुरातील इरई नदीमध्ये रामसेतू पुलाच्या खाली फेकले, ज्या चाकूने हत्या केली तो चाकू भद्रावती-सुमठाणा रस्त्याच्या कडेला टाकला. तसेच स्वत:चे कपडेही जाळून टाकले.

एक महिन्यापासून रचला होता कट

आपसी वादातून मृत तरुणीने विधिसंघर्षग्रस्त मैत्रिणीला एक दिवस घराबाहेर ठेवले होते. त्यामुळे तिला अपमानास्पद वाटले. तिने आपल्या प्रियकराच्या मदतीने तिला संपविण्याचा कट एक महिन्यापूर्वीच रचला होता.

Web Title: Murder of a headless young woman; Another accused, a roommate's boyfriend, was also caught by the LCB

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.