तीन तलाक बिलाच्या विरोधात मुस्लीम महिलांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 11:12 PM2018-04-16T23:12:38+5:302018-04-16T23:12:50+5:30
केंद्र सरकारच्या तीन तलाक बिलच्या विरोधात बल्लारपूर येथील मुस्लीम महिलांनी सोमवारी मोर्चा काढला. शरीअत बचाव कमिटी मार्फत निघालेला हा मोर्चा येथील मंगलमूर्ती लॉन वरून एसडीओ कार्यालयावर धडकला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : केंद्र सरकारच्या तीन तलाक बिलच्या विरोधात बल्लारपूर येथील मुस्लीम महिलांनी सोमवारी मोर्चा काढला. शरीअत बचाव कमिटी मार्फत निघालेला हा मोर्चा येथील मंगलमूर्ती लॉन वरून एसडीओ कार्यालयावर धडकला. त्यानंतर तीन तलाक बिल रद्द करावे, या मागणीचे निवेदन राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या मार्फतीने पाठविण्यात आले.
तीन तलाक बील लोकसभेत घाईघाईने मंजूर करण्यात आले आहे. तो कायदा मागे घ्यावा, या मागणीसोबतच कठुवा, उन्नाव व सूरत येथे झालेल्या अत्याचाराच्या घटनांमधील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. या मोर्चात तीन तलाक बिल विरोधात घोषणा देत मुस्लीम महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती.