राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे मूक आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 11:25 PM2018-03-10T23:25:45+5:302018-03-10T23:26:01+5:30

जागतिक महिला दिनी सर्वत्र महिलांचा सन्मान व गौरव करण्यात येतो. मात्र त्याच महिलांच्या सुरक्षेकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे.

Mute movement of NCP Women's Congress | राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे मूक आंदोलन

राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे मूक आंदोलन

Next
ठळक मुद्देसरकारविरोधी निदर्शने : महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत वाढ

आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : जागतिक महिला दिनी सर्वत्र महिलांचा सन्मान व गौरव करण्यात येतो. मात्र त्याच महिलांच्या सुरक्षेकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी राज्यातच नव्हे, तर संपूर्ण देशात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी महिला काँगेसच्या वतीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी यांच्या पुतळ्यासमोर महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी मूक आंदोलन करण्यात आले.
दिवसेंदिवस महिलांवरील बलात्कार, अ‍ॅसिड हल्ले, खून, मारहाण, छेडखानी या घटनेमध्ये वाढ होत आहे. दररोज महिला यासारख्या घटनेला सामोर जात आहेत. कायद्याचा कोणालाही धाक राहिला नसून कायद्याची अंमलबजावणी योग्य होताना दिसत नाही. परिणामी भाजप सरकारच्या काळात कायदा व सुव्यवस्था धोक्यात आलेली दिसून येत आहे. त्यामुळे महिला व मुलींना एकटे बाहेर पडण्यास भीती निर्माण झाली आहे. यासाठी शासनाकडून कठोर पावले उचलण्याची गरज असताना भाजप सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांकडून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी ‘बडते जाते महिलाओंपे अत्याचार कहाँ गये फडणवीस सरकार’, ‘लगातार बलात्कार फडणवीस सरकार गुन्हेगार’, ‘हमे चाहिये सुरक्षा, हिंसा नहीं सन्मान’, असा मजकूर लिहलेले फलक दाखवून निषेध करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके, शहराध्यक्ष ज्योती रंगारी, ज्येष्ठ नेते डी. के. आरिकर, सुनील काले, हेमलता पाजनकर, जिल्हा उपाध्यक्ष वंदना आवले, जिल्हा सचिव सबीहा देवगळे, नगरसेविका मंगला आखरे तालुकाध्यक्ष मनीषा काकडे, सुनीता नरडे, सुषमा राऊत, दयाबाई गोवर्धन, उपाध्यक्ष चांदनी राजुरकर, पूजा पडोळे, सरस्वती गावंडे, सुचिता बोरकर, सुमित्रा वैद्य, निर्मला नरवडे, शर्मिला बिश्वास, लता जांभुळकर, सोनाली चरडुके यांचा सहभाग होता.

Web Title: Mute movement of NCP Women's Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.